देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 23, 2025
in परभणी
0
संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची
Please Share

माजी सनदी अधिकारी खोब्रागडे यांचे मत, इंजि. एस.एस. नांदापुरकर राष्ट्रीय परिसंवाद, स्मृती पुरस्कार’ सोहळा उत्साहात

परभणी : भारतीय संविधान हा सर्वंकष विकासाचा आणि परिवर्तनाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. हुकूमशाहीकडे झुकलेल्या राज्यकर्त्यांपासून संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी संविधानातील ‘आम्ही भारतीय लोक’ यांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.
परभणी येथील श्री.शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात २१ सप्टेंबर रोजी विवेकानंद शिक्षण संस्थेद्वारे आयोजित ‘इंजि. एस.एस. नांदापुरकर राष्ट्रीय परिसंवाद तथा स्मृती पुरस्कार’ सोहळ्याच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. खोब्रागडे यांनी शासनाकडून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि मागासवर्गीयांचा निधी इतर कामांसाठी वळवला जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते झाले. त्यांनी नवीन पिढीला सामाजिक बदलासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात माजी न्यायमूर्ती डी.आर. शेळके यांना ‘इंजि. एस.एस. नांदापुरकर स्मृती राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना श्री.शेळके म्हणाले की, भारतीयांनी अनिष्ट रूढी-परंपरा सोडून संत आणि महापुरुषांनी दाखवलेली विवेकबुद्धी स्वीकारल्यास राष्ट्र समृद्ध होईल.
या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुरेश सदावर्ते, इंजि. भीमराव हाटकर, न्यायमूर्ती भूषण काळे, प्राचार्य बी.यू. जाधव, मंगेश नरवाडे, विधिज्ञ अशोक सोनी, बी.एच. सहजराव, प्रा. डॉ. भीमराव खाडे आणि प्रा. डॉ. सुरेश हिवराळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘वृक्षमित्र’ कैलास गायकवाड यांच्या संकल्पनेतून परिसरात वृक्षारोपण करून झाली. त्यानंतर संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन यशवंत मकरंद यांनी केले, तर प्रास्ताविक सुधीर जाधव यांनी मांडले. अतिथींचा परिचय प्राचार्य सारंग साळवी यांनी करून दिला, तर मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. सुरेश शेळके यांनी केले. विश्वजीत वाघमारे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक गोविंद नांदापुरकर, बाळासाहेब नांदापुरकर, रवी पंडित, संजीव आढागळे, प्रेमानंद बनसोड, प्रा. अतुल वैराट, आर्यन बनसोडे, ए.पी. राऊत, देवानंद घनसावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,172
Please Share
Previous Post

शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची मागणी

Next Post

सभापती डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सभापती डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

सभापती डॉ.संजय रोडगे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ