देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूच्या पोस्टामध्ये नियोजनाचा बोजवारा; मनमानी कारभारामुळे ग्राहक संतप्त

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 4, 2026
in परभणी
0
सेलूच्या पोस्टामध्ये नियोजनाचा बोजवारा; मनमानी कारभारामुळे ग्राहक संतप्त
Please Share

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तासनतास ताटकळत ठेवल्याने संताप; मागच्या दाराने व्यवहार उरकत असल्याचे आरोप

सेलू : परभणी जिल्ह्यातील सेलू येथील मुख्य पोस्ट ऑफिसच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, येथील कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोस्टाच्या विविध बचत योजना आणि आर्थिक व्यवहारांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असतानाच, ओळखीच्या व्यक्तींचे आणि एजंटांचे व्यवहार मागच्या दाराने उरकले जात असल्याचे चित्र शनिवारी, ४ एप्रिल २०२६ रोजीही दिसून आले.

सेलू येथील मुख्य टपाल कार्यालयात बचत खाते, मुदत ठेव, सुकन्या समृद्धी योजना आणि आवर्ती ठेव यांसारख्या विविध योजनांच्या देवघेवीसाठी दररोज मोठी गर्दी असते. विशेषत: मार्च एप्रिलमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक असतात. मात्र, येथील खिडकीवरील व्यवहार अत्यंत संथ गतीने चालत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, नियमानुसार रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकडे दुर्लक्ष करून काही कर्मचारी ओळखीच्या व्यक्तींची कामे प्राधान्याने करत असल्याचा आरोप संतापलेल्या ग्राहकांनी केला आहे. यामुळे भर उन्हात आणि गर्दीत ताटकळत उभ्या असलेल्या नागरिकांचा संयम सुटत असून कार्यालयात वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

दुसरीकडे, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या खिडकीवरही गोंधळाचे वातावरण आहे. या खिडकीवर नियुक्त असलेले कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने १ ते २ तासांपासून ग्राहकांना ताटकळत थांबावे लागले. अन्य खिडक्यावरही कर्मचारी जागा सोडून कार्यालयात इतरत्र फिरत असतात. टपाल विभागाच्या या नियोजनाअभावी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सेलूतील पोस्ट ऑफिसच्या कामकाजाचा दर्जा खालावत असल्याची भावना व्यक्त होत आहे. वरिष्ठांनी याकडे तातडीने लक्ष देऊन कामकाजात शिस्त आणावी आणि सर्वसामान्य ग्राहकांची अडवणूक थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Post Views: 1,620
Please Share
Previous Post

पसायदानात वैश्विक कल्याणाचा जागर

Next Post

साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय

साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ