देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 24, 2026
in परभणी
0
निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा
Please Share

सेलूतील प्रशिक्षणात निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव यांचे आदेश

सेलू : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत सेलू तालुक्यातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य अचूकपणे पार पाडावे. कामात कुठलीही टाळाटाळ खपवून घेतली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश निवडणूक निर्णय अधिकारी शोभादेवी जाधव यांनी दिले आहेत.

शनिवारी, २४ जानेवारी रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिरात दोन सत्रात मतदान केंद्राध्यक्ष आणि अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण उत्साहात पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना शोभादेवी जाधव बोलत होत्या. ही निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. या प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, नायब तहसीलदार जयश्री कोल्हे आणि विजय मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मगर यांनी सादरीकरणाद्वारे मतदान प्रक्रिया, यंत्रांचे सिलिंग, अभिरूप मतदान आणि केंद्राध्यक्षांच्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाने नैतिक वर्तनाचे पालन करून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. या प्रशिक्षणासाठी सहायक महसूल अधिकारी हरिष टाक, अशोक राऊत, प्रताप शेरे, शेख नूर आणि विजय सोंजे यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षणास नियुक्त ७२२ पैकी ६७० कर्मचारी उपस्थित होते, तर ५२ अनुपस्थित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण ३० जानेवारी रोजी, तर तिसरे व अंतिम प्रशिक्षण ४ फेब्रुवारीला होईल. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडेल आणि ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणीसह निकाल जाहीर होईल, अशी माहिती डॉ. मगर यांनी दिली. प्रशिक्षणात सर्व नियुक्त अधिकार्‍यांनी मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया, यंत्र सिल करण्याविषयी हॅन्डऑन प्रशिक्षण घेतले.

Post Views: 1,621
Please Share
Previous Post

१६२ जागांसाठी १,२२२ जणांचे अर्ज वैध

Next Post

कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना पद्मश्री

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना पद्मश्री

कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना पद्मश्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ