देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना पद्मश्री

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 25, 2026
in महाराष्ट्र
0
कृषी तज्ज्ञ दादा लाड यांना पद्मश्री
Please Share

कापूस लागवडीच्या तंत्रज्ञानाचा देशपातळीवर गौरव

परभणी : कापूस या पिकासदर्भात स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करून असंख्य शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देणारे ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ श्रीरंग देवबा लाड तथा दादा लाड यांना भारत सरकारने पद्मश्री हा नागरी सन्मान जाहीर केला आहे.

प्रत्येक भागानुसार कपाशी लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. यामध्ये मातीचा प्रकार तसेच पाण्याची उपलब्धता इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. परंतु या सगळ्या पद्धतींमध्ये जर आपण परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावचे श्रीरंग देवबा लाड यांचे लागवड तंत्रज्ञान कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. दादा लाड यांच्या तंत्रज्ञानामध्ये कपाशीचे लागवड करताना योग्य अंतर आणि गरजेनुसार संतुलित खतांचा वापर इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व आहे व त्यासोबतच झाडाची उंची कमी ठेवण्याची शिफारस व त्याकरता झाडाचे गळफांदी कापणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश होतो. विशेष म्हणजे त्यांच्या या तंत्रज्ञानाला नवी दिल्ली येथील आयसीएआर म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने देखील मान्यता दिलेली आहे. नुकतीच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठानेही त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्माननीय पदवी बहाल केली आहे.

…असे आहे दादा लाड यांचे कापूस तंत्रज्ञान

गळफांदी कापून, झाडाची उंची कमी ठेवून कापूस उत्पादनवाढीचे तंत्र भारतीय किसान संघाचे दादा लाड यांनी विकसित केले आहे. असे केल्याने एकरी कमीत कमी १५ ते २१ क्विंटल उत्पादन येऊ शकते. या तंत्राला नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)ने मान्यता दिली आहे. महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या तंत्राचा वापर करून समाधानकारक उत्पादन घेत आहेत. या तंत्राचा मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकरी वापर करून समाधानकारक उत्पादन घेत आहेत. या संदर्भात परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला आहे. गंगाखेड तालुक्यातील मसला गावातील शिवाजी गंगाधर शिंदे हे चार एकर कापूस लागवडीतून एकरी २४ क्विंटल उत्पादन घेण्यात यशस्वी झाले आहेत, तर परभणी येथील बद्रीनाथ नारायण सोनी हे जनकल्याण समितीचे अध्यक्ष आहेत. सोनी यांनी या तंत्राचा प्रचार आणि प्रसार केला आहे. स्वतः शेतात या तंत्राचा अवलंब केला. मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील अशोक देशमाने, सेलू तालुक्यातील डासाळा गावातील विठ्ठल गजमल या शेतकर्‍यांनी चार एकरांतून कापसाचे किफायतशीर उत्पादन घेतले आहे.

Post Views: 1,495
Please Share
Previous Post

निवडणूक कर्तव्य अचूक पार पाडा

Next Post

नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ