देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2025
in परभणी
0
"हर घर तिरंगा" अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे
Please Share

जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन

परभणी : राज्यात १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत “हर घर तिरंगा”अभियान राबवले जात आहे. या उपक्रमात विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी अभियानासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली:

पहिला टप्पा (८ ऑगस्टपर्यंत): या टप्प्यात स्वयंसेवकांनी harghartiranga.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या स्वयंसेवकांद्वारे हे अभियान घरोघरी पोहोचवले जाणार आहे. शिक्षण विभागाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी आणि विविध स्पर्धा आयोजित कराव्यात.
दुसरा टप्पा (८ ते १२ ऑगस्ट): या काळात तिरंगा महोत्सव, देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम, तिरंगा बाईक आणि सायकल रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
तिसरा टप्पा (१३ ते १५ ऑगस्ट): या टप्प्यात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवणे अपेक्षित आहे. घरांव्यतिरिक्त सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी आणि खासगी आस्थापनांमध्येही राष्ट्रध्वज फडकवला जावा.
स्वच्छता आणि स्पर्धांवर भर

यावर्षी “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग” हे घोषवाक्य आहे. त्यामुळे अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहिमांवरही विशेष भर दिला जाणार आहे. प्रमुख शासकीय कार्यालये, महत्त्वाची स्थळे, पाणीसाठे आणि वारसा स्थळांवर तिरंगा रोषणाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याशिवाय, रांगोळी आणि राखी बनवण्याच्या स्पर्धांसारखे उपक्रम आयोजित केले जातील. जिथे स्पर्धा शक्य नाही तिथे कार्यशाळांचे आयोजन करावे. सर्व शासकीय संकेतस्थळांवर “हर घर तिरंगा” संबंधित मजकूर आणि लोगो वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

या अभियानासाठी स्वयंसेवकांनी पुढे यावे, यासाठी एन.एस.एस. आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच इतर नागरिक harghartiranga.com या संकेतस्थळावर नोंदणी करू शकतात. “तिरंगा मेला” आणि तिरंग्यासोबत सेल्फी काढून अपलोड करण्यासारख्या उपक्रमांवरही लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी आणि सेल्फी अपलोड करण्यासाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,122
Please Share
Previous Post

टेनिस व्हॉलीबॉल राज्य पंच परीक्षा, कार्यशाळा उत्साहात

Next Post

रक्तदान करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अण्णाभाऊ साठे यांना रक्तदान करून अभिवादन

रक्तदान करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ