देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
in परभणी
0
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश
Please Share

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या नामांकित शाळांमध्ये रामराव नाईक इंग्लिश स्कूल, मुन्सीराम तांडा (ता. सोनपेठ), कै. मानसिंग नाईक इंग्रजी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुन्सीराम तांडा (सायखेडा), जिजामाता पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (सोनपेठ), एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल (सेलू), प्रॉस्पेरियस पब्लिक स्कूल (सेलू), हायटेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (एरंडेश्वर झिरो फाटा, ता. पूर्णा), हायटेक माध्यमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय (कारेगाव रोड, परभणी), व्हिजन पब्लिक इंग्लिश स्कूल (विटा रोड, सोनपेठ), हिरकणी सीबीएसई इंग्लिश स्कूल (चोरवड, ता. पालम), गोल्डन ग्लोबल इंग्लिश स्कूल (कोद्री रोड, गंगाखेड), रामरामजी लोहट पब्लिक स्कूल (धर्मापुरी परिसर, पाथरी रोड, परभणी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय (सीबीएसई), पूर्णा यांचा समावेश आहे. या शाळांमध्ये सन २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

परभणी दि. २५ : राज्य शासनाकडून सन २०२१-२२ पासून धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, परभणी जिल्ह्यातील इच्छुक भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण, निवास, भोजन, आरोग्य, शैक्षणिक साहित्य आणि शालेय गणवेश यासारख्या सर्व सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येणार आहेत.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजातील असावा आणि पालकांनी विद्यार्थ्यांच्या नावे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या धनगर समाजाच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १.०० लक्ष इतकी असावी आणि सन २०२६-२०२७ या वर्षात नवीन विद्यार्थी १ ली ते ८ वी या इयत्तेत प्रवेशित असावा, अशा प्रवेशाच्या अटी व शर्ती आहेत.

प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले अर्ज ०६ जुलै, २०२६ पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत) सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, परभणी यांचे नावे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या कार्यालयात प्रत्यक्ष सादर करावेत. या योजनेचा धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.

Post Views: 1,375
Please Share
Previous Post

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता खाजगी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू

Next Post

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

सेलूच्या 'एसबीआय'मध्ये ग्राहकांची कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

राजर्षी शाहू महाराज आरक्षणाचे जनक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

राजेंद्र सोनवणे यांचे मत, नूतन विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन सेलू | प्रतिनिधी : सेलू् येथील नूतन विद्यालयात...

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

सेलूच्या ‘एसबीआय’मध्ये ग्राहकांची कोंडी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शाखा व्यवस्थापकांच्या अरेरावीची कैफियत; ग्राहक पंचायतीची थेट मुंबई मुख्य कार्यालयाकडे तक्रार वरिष्ठ कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवले निवेदन सेलू I प्रतिनिधी :...

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये मोफत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ६ जुलै २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील निवड झालेल्या नामांकित शाळांमध्ये रामराव...

संत भगवान बाबा

संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाकरिता खाजगी जमीन खरेदी प्रक्रिया सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 26, 2026
0

एक एकर जागेची आवश्यकता, शासकीय बाजारभाव (रेडी रेकनर) दराने खरेदी होणार परभणी : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ