यासेर उर्दू प्राथमिक शाळेचा उपक्रम
सेलू : सेलू गौरव सेवा भावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळा, गुलमोहर कॉलनी येथे दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने कविता गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कविता गायन स्पर्धेत इयत्ता तिसरी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धकांनी आपल्या आवडीच्या आणि देशभक्तीपर कविता सादर करून आपले कलाकौशल्य दाखवले. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आल्यामुळे दोन्ही गटांतील मुला-मुलींनी अतिशय छान कविता सादर केल्या.या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सय्यद अजीम, सय्यद साजिद, सय्यद अमन, सय्यद इमरान आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांनी यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनप्रवासाविषयी आणि त्यांच्या संघर्षाबद्दल मोलाची माहिती सांगितली. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य किती अपार कष्टांनंतर आणि संघर्षातून मिळाले, याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना देऊन प्रेरित केले.





