वैचारिक व सांस्कृतिक पर्वाची ६५ वर्षांची परंपरा
सेलू जि.परभणी : गणेशोत्सवात ज्ञान-विज्ञान, मनोरंजन आणि ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) शहरात सोमवार ते गुरुवार ( २१ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२६) या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे ६५ वे वर्ष आहे. नूतन विद्यालयातील कै. राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात हे कार्यक्रम होणार आहेत.
सोमवार, २१ सप्टेंबररोजी ‘पद्मश्री नारायण सुर्वे : आधुनिक साहित्यातले ‘कबीर’ ‘ या विषयावर प्रा. डॉ. विश्वाधार देशमुख (नांदेड) विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजाराम, तर संयोजन प्रा. डॉ. अशोक पाठक, भगवान देवकते आणि मोहन खापरखुंटीकर करणार आहेत.
मंगळवार, २२ सप्टेंबररोजी “आजच्या मुलांची बदलती मानसिकता” या विषयावर परिसंवाद आहे. यामध्ये डॉ. सुबोध माकोडे, महिला पोलिस अस्मिता मोरे, शिक्षक शशिकांत देशपांडे, आजोबा नात्याने रामकिशन (आबा) सोळंके, समुपदेशक प्रविण सोनोने, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जय विजय चौधरी आणि सान्वी बाबासाहेब हेलसकर भूमिका मांडतील. सेलू येथील व्हिजन इंग्लिश स्कूलचे अध्यक्षीय संचालक संतोष कुलकर्णी अध्यक्षस्थानी असतील. संयोजन ॲड. पौर्णिमा जोहिरे, प्रणिता सोलापुरे व संध्या फुलपगार करतील.
बुधवार, २३ सप्टेंबररोजी “श्वासाचे महत्त्व आणि ओंकार” या विषयावर डॉ. चारुशिला जवादे (परभणी) यांचे व्याख्यान आहे. योगशिक्षक डी. डी. सोन्नेकर अध्यक्षस्थानी असतील. संयोजक रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर व कैलास कदम हे या सत्राचे संयोजन करतील.
गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी स्थानिक कलाकारांचा “आशा-सुमन (स्वरांजली)” हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. माजी आमदार हरिभाऊ लहाने अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष मिलिंद सावंत आणि साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपनगराध्यक्ष सांईराज बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जिप सभापती अशोक काकडे, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने आणि नप सदस्य प्रभाकर सुरवसे लाभणार आहेत. या मैफिलीत हेमलता देशमुख, अलका पांडे, रमा बाहेती, प्रीती राठी, प्रीती सराफ, मनिषा पांडे, शिल्पा दिक्षीत, पद्मजा खारकर, सुषमा दामा, सीमा सुक्ते, मंजुषा बोराडे, वैष्णवी शिवणकर, स्वाती तांबे, साक्षी गोसावी आणि रसिका दायमा या प्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांची गाणी सादर करतील. संयोजन मोहन बोराडे, सच्चिदानंद डाखोरे व पूजा तोडकर-महाजन तर ध्वनी संयोजन गंगाधर कान्हेकर यांचे आहे.
या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक के. के. देशपांडे, चिटणीस अजित मंडलिक, समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड आणि आणि कार्यकारिणी मंडळाने केली आहे.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी मंडळातील पदाधिकारी अध्यक्ष : के. के. देशपांडे कार्याध्यक्ष : चंद्रशेखर मुळावेकर, राजेश ठेंगे, लता गिल्डा, चिटणीस : अजित मंडलिक, समन्वयक डॉ. काशिनाथ पल्लेवाड, कोषाध्यक्ष : उज्ज्वला सतीश भाला, उपाध्यक्ष : संजय विटेकर, किशोर जोशी, प्रा. ए. डी. कुलकर्णी, डॉ. ऋतुराज साडेगावकर, बाबासाहेब हेलसकर, चंद्रशेखर नावाडे, बाबासाहेब चारठाणकर, शोभा कोरडे, जयश्री सोन्नेकर, डी. डी. सोन्नेकर, डॉ. सुरेश हिवाळे, कल्याण पवार, डॉ. शरद ठाकर, प्रा. प्रभाकर रावते, अविनाश बिहाणी, उपेंद्र बेल्लूरकर, जी. ए. गुंजकर, प्रा. नागेश कान्हेकर, संजय वाघ, बी. टी. गजमल, शोभा ढवळे, सुधाकर नरळदकर, महंम्मद इलियास, संतोष खाडप, डॉ. राजेन्द्र मुळावेकर, डॉ. विलास मोरे, सहचिटणीस : दिलीप डासाळकर, ललिता गिल्डा, गणेश माळवे, सुभाष मोहकरे, आर. डी. कटारे, नारायण ईक्कर, आनंद बाहेती, एन. एम. देशपांडे, रूपा काला, मीरा बहिवाल, दुर्गादास कुलकर्णी, भालचंद्र गांजापूरकर, के. जी. कुलकर्णी, सतीश बाहेती, धनंजय भागवत, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी विटेकर, रेवणअप्पा साळेगावकर, प्रवीण माणकेश्वर, गुरूवसअप्पा पंचगल्ले, रघुनाथ देशमुख, बालाजी देऊळगावकर, गीता मुळावेकर, मेघना चौधरी, सदस्य : एस. आर. देशपांडे, एन. जी. बंगाळे, रौफ खान पठाण, अनिल कौसडीकर, श्रीपाद कुलकर्णी, आर. जी. गोरे, प्रा. देविदास ढेकळे, बी. आर. सोनटक्के, नरेंद्र झाल्टे, यमुना खारकर, मधुरा खारकर, नीता मालाणी, मंदा मेहता, अनिता कुलकर्णी, नीता बलदवा, सविता कासट, मीना मालाणी, राजश्री शिवणकर, संगीता खारकर, अल्का धर्माधिकारी, गिरीश दीक्षित, लक्ष्मीकांत दिग्रसकर, संजय मंडलिक आदींसह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.





