मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी तंत्रज्ञान पोहोचविण्याचा संकल्प

सेलू : भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त सेलू येथे अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विश्वेश्वरय्या यांच्या महान कार्याचे व अभियंता क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अभियांत्रिकी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन तांत्रिक बदलांचा उपयोग समाजाच्या विकासासाठी कशा पद्धतीने करता येईल, तसेच नवीन तंत्रज्ञान व नावीन्यपूर्ण संकल्पना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे कशा पोहोचविता येतील, याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बदलत्या काळानुसार अभियंत्यांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून समाजहितासाठी त्याचा उपयोग करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास सेलू इंजिनीयर असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंग धामणगावकर, उपाध्यक्ष रवी मंत्री, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्कर कोलते, तसेच सतीश बलदेवा, प्रमोद कुलकर्णी, पठाण, उदय दडके, गंगाधर अडळकर, प्रशांत माणकेश्वर, सदस्य सुशील नाईकवाडे, भगवान कुमावत, बालाजी उदावंत, प्रशांत सोनेकर, आकाश आकात, हदी अन्सारी, अर्शद शेख, मुजमिल शेख, अबूबकर खान, असलम मोदी, आसरार शेख, विनीत मालाणी, योगेश गजमल आदी अभियंते उपस्थित होते. अभियंता क्षेत्राच्या माध्यमातून सेलूच्या विकासासाठी तसेच समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्यासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.




