प्रबोधनाची ६३ वर्षांची परंपरा, सेलूमध्ये व्याख्यानांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सेलू जि.परभणी : गणेशोत्सव काळात ज्ञान, मनोरंजन आणि ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन व्हावे, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथे गुरुवारपासून (२८ ऑगस्ट) चार दिवसीय गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार आणि शुक्रवार ( २८ आणि २९ ऑगस्ट) तसेच बुधवार आणि गुरूवार ( ३ आणि ४ सप्टेंबर) असे चार दिवस नूतन विद्यालयाच्या कै.राजेंद्र बन्सीलालजी गिल्डा सभागृहात दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. व्याख्यानमालेचे हे ६४ वे वर्ष आहे.
गुरुवारी (२८ ऑगस्ट) “पद्मश्री अरण्यऋषी मारुती चितमपल्ली” या विषयावर व्याख्यान आहे. पक्षी निरीक्षक माणिक पुरी आणि माधव गव्हाणे विचार मांडणार आहेत. अध्यक्षस्थान विजय ढाकणे भूषवितील. शुक्रवारी (२९ ऑगस्ट “पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर” या विषयावर परभणी येथील बालविद्या मंदिर हायस्कूलचे शिक्षक सुभाष ढगे विचार मांडतील. अध्यक्षस्थानी नूतन कन्या प्रशालेतील शिक्षिका संगिता खराबे असतील. बुधवारी, (३ सप्टेंबर) “महिलांना काय हवे? रक्षण की आरक्षण” या विषयावर ॲड.माधुरी क्षीरसागर ( परभणी) यांचे व्याख्यान आहे. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या सल्लागार ॲड.निलिमा कोकड (परभणी) असतील. गुरूवारी (४ सप्टेंबर) “संतवाणी – संगीत दृश्यनाटिका” हा सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिभाऊ लहाने, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, विनोद बोराडे, माजी जिप सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये सीमा आष्टीकर, मेघना चौधरी, गीता मुळावेकर, मीरा देशमुख, मनिषा धर्माधिकारी, शुभदा सुभेदार, पद्मजा खारकर, सरिता उमरीकर, माधवी पिंगळे, प्रज्ञा गुंडेकर, रोहिणी वाकोडकर, माधुरी चारठाणकर, स्वप्नीता ढवळे, सुलभा देशपांडे, स्वप्ना पांडव, शीतल वाकडीकर आदी कलाकार सहभागी आहेत. विविध कार्यक्रमांचे संयोजक म्हणून उपेंद्र बेल्लूरकर, संजय विटेकर, जी.ए.गुंजकर, डॉ.सुरेश हिवाळे, डॉ.शरद ठाकर, प्रा.नागेश कान्हेकर, पौर्णिमा जोहिरे, प्रणिता सोलापुरे, मेघना चौधरी, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, भालचंद्र गांजापूरकर, वर्षा राजवाडीकर, मनिषा धर्माधिकारी, गंगाधर कान्हेकर आदी काम पाहात आहेत. व्याख्यानमालेस रसिक, श्रोत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष तथा नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, चिटणीस अजित मंडलिक, समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड तसेच पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
प्रबोधनाची ६३ वर्षांची परंपरा
सेलूभूषण स्व.शंकरराव मंडलिक गुरुजी यांच्या पुढाकाराने सेलू शहरात गणेशोत्सव व्याख्यानमाला सुरू झाली. पुढे स्व.गिरीश लोडाया यांनी चिटणीस म्हणून २७ वर्षे नेटाने हा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींच्या मार्गदर्शनात याही वर्षी विविध कार्यक्रम होत आहेत. स्थानिक वक्ते, साहित्यिक, नाट्य, संगीत कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही व्याख्यानमाला चालते. विविध कार्यक्रमांच्या आयोजनात नीटनेटकेपणा, शिस्त आजवर जपली गेली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच बैठकीत सर्वसंमतीने कार्यकारिणी निवडली जाते. आणि उपस्थित नागरिकांकडून स्वेच्छेने गोळा झालेल्या रकमेतून आयोजनाचा खर्च भागविला जातो. ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रबोधन, जनजागृती आणि मनोरंजन आदींवरच प्रामुख्याने भर देत प्रबोधनाची ६३ वर्षांची परंपरा आजही जपली जात आहे.
विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग
व्याख्यानामालेच्या यशस्वीतेसाठी सेलू शहरातील सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक आदींसह विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरत आलेला आहे. यामध्ये व्याख्यानमालेचे अध्यक्ष एस.व्ही.पाटील, चिटणीस अजित मंडलिक, कार्याध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संतोष कुलकर्णी राजेश ढगे, लता गिल्डा कोषाध्यक्ष उज्ज्वला सतीश भाला, समन्वयक डॉ.काशिनाथ पल्लेवाड, उपाध्यक्ष किशोर जोशी, प्रा.ए.डी.कुलकर्णी, अविनाश बिहाणी, प्रा.प्रभाकर रावते, डॉ.ऋतुराज साडेगावकर, बाबासाहेब हेलसकर, चंद्रशेखर नावाडे, बाबासाहेब चारठाणकर, शोभा कोरडे, जयश्री सोन्नेकर, डी.डी.सोन्नेकर, डॉ.सुरेश हिवाळे, कल्याण पवार, संजय वाघ, बी.टी.गजमल, शोभा ढवळे, सुधाकर नरळदकर, भगवान देवकते, महंम्मद इलियास, संतोष खाडप, सहचिटणीस दिलीप डासाळकर, ललिता गिल्डा, नारायण इक्कर, आनंद बाहेती, एन.एम.देशपांडे, सतीश नावाडे, दुर्गादास कुलकर्णी, मोहन खापरखुंटीकर, के.जी.कुलकर्णी, सतीश बाहेती, धनंजय भागवत, गणेश माळवे, सुभाष मोहकरे, आर.डी. कटारे, रुपा काला, मीरा बहिवाल, रोहिणी कुलकर्णी, अश्विनी विटेकर, रेवणअप्पा साळेगावकर, प्रवीण माणकेश्वर, गुरूबसअप्पा पंचगल्ले, रघुनाथ देशमुख, बालाजी देऊळगावकर, गीता मुळावेकर, सदस्य एस.आर.देशपांडे, एन.जी.बंगाळे, रौफखान पठाण, अनिल कौसडीकर, श्रीपाद कुलकर्णी, आर.जी.गोरे, प्रा. देविदास ढेकळे, बी.आर.सोनटक्के, नरेंद्र झाल्टे, मधुरा खारकर, नीता मालाणी, चंदा मेहता, संध्या फुलपगार, राजश्री शिवणकर, संगिता खारकर, अनिता कुलकर्णी, नीता बलदवा, सविता कासट, मीना मालाणी, वसुधा खारकर आदींचा सहभाग आहे.





