सेलू : ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा काष्टे हिने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत विभागीय विज्ञान मेळाव्यात उत्तम सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आहे. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी रमण सायन्स सेंटर, नागपूर येथे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यात तिने परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. तिच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, मुख्याध्यापक शालिनी शेळके, हरिभाऊ कांबळे, कैलास ताठे आणि मार्गदर्शक शिक्षक इ.पी.पांचाळ, डी.एस.ठोके यांनी तिचे कौतुक केले आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





