सेलू पालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवडीबद्दल साईबाबा बँकेतर्फे गौरव
सेलू : साईबाबा नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची सेलू नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल बँकेच्या मुख्य कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
हेमंतराव आडळकर यांच्या प्रदीर्घ सामाजिक आणि राजकीय अनुभवाचा शहराच्या विकासासाठी उपयोग होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. या छोटेखानी सत्कार सोहळ्याला बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक दत्तराव आंधळे, प्रतापसेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, प्रसिद्ध उद्योजक विलास पौळ, व्यवस्थापक एकनाथ पौळ, निसार पठाण, अविनाश आडळकर, सुनील बोडखे, नितीन आडळकर, अनिल जाधव, सुमित आडळकर, गजानन झुटे, अविनाश जाधव, गजानन ढवळे, संतोष जायभाये, उमेश खरावणे यांच्यासह बँकेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




