देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष परळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 15, 2026
in वाशिम
0
पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष परळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Please Share

देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम : मंगरुळपीर शहरातील नागरिकांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नगराध्यक्ष अशोकभाऊ महादेवराव परळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

महात्मा ज्योतिबा फुले चौक येथील सोनाई कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. उद्घाटनानंतर दत्तामामा भरणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणी, संघटनात्मक काम आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याबाबत मौलिक विचार मांडले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर म्हणाले,”माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते झाले. मामांनी आवर्जून उपस्थित राहून मार्गदर्शन केले तसेच पक्षबांधणीबाबत अत्यंत मौलिक विचार मांडले. त्यांनी आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.”“माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि माझ्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे सोबत राहणाऱ्या माझ्या परिवाराचे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कट्टरपणे काम करणाऱ्या आणि स्वर्गीय अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो,” असेही परळीकर यांनी सांगितले.“आपल्यापेक्षा पक्ष मोठा” या विचाराने काम करणाऱ्या प्रत्येक राष्ट्रवादी कार्यकर्त्यामुळेच पक्षाची खरी ताकद दिसून येते. ही ताकद पदांमध्ये नव्हे, तर आपण कमावलेल्या माणसांमध्ये असते, असे मतही अशोकभाऊ परळीकर यांनी व्यक्त केले.जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला मंगरुळपीर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा याबद्दलही त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. आगामी काळात नागरिकांच्या अडचणी, नागरी सुविधा, विकासकामे आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी हे कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post Views: 1,599
Please Share
Previous Post

सर्वसमावेशक विकासाकडे वाशिम जिल्ह्याची वाटचाल : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

वनामकृवित प्रगत कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

बाबाजानी दुर्रानींचा २४३ कोटींचा महाघोटाळा; जेलची हवा अटळ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

आमदार सईद खान यांच्या स्फोटक आरोपाने खळबळ देशनिष्ठ प्रतिनिधी, पाथरी:- "पस्तीस वर्षांची दादागिरी, दहशत आणि लूट जनता दरबारात धुळीस मिळाली....

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

१९ ऑगस्टपर्यंत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे मृद व जलसंधारण विभागाचे आवाहन वाशिम...

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

विद्यार्थ्यांच्या देशभक्तिपर मनोगतातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाशिम : येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेजमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला...

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात  स्वातंत्र्यदिन उत्साहात

यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 16, 2026
0

वाशिम:- यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी मोतीरामजी ठाकरे...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ