देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा नांदेड

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ केडर कॅम्पची नांदेडमध्ये जय्यत तयारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2026
in नांदेड, मराठवाडा
0
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ केडर कॅम्पचीनांदेडमध्ये जय्यत तयारी
Please Share

मान्यवरांची उपस्थिती; आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यधिष्ठित पत्रकारितेचे प्रशिक्षण

देशनिष्ठ प्रतिनिधी, नांदेड : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (व्हीओएम) इंटरनॅशनल फोरमच्या वतीने नांदेड येथील आनंद सागर मंगल कार्यालय, सांगवी येथे रविवारी, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता, आयोजित मराठवाडास्तरीय केडर कॅम्पची जय्यत तयारी सुरू असून, या शिबिरास मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील पदाधिकाऱ्यांसह राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. केडर कॅम्पचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे (मुंबई, दिल्ली) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी लोहा-कंधार विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के भूषवणार आहेत.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय कार्यवाहक शंतनू डोईफोडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष दिगंबर महाले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (मुख्य) विजय चोरडिया, विभागीय प्रदेशाध्यक्ष अजितदादा कुंकुलोळ, विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, सरचिटणीस गजानन देशमुख, सह सरचिटणीस श्रीनिवास भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते तसेच महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य पंढरीनाथ बोकारे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संघटनात्मक बांधणीसोबतच पत्रकारितेतील बदलते स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञान, पत्रकारितेचे भवितव्य आणि मूलभूत मूल्ये याबाबत पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा या कॅम्पचा प्रमुख उद्देश आहे. ‘आपण पत्रकारिता का करतो? ती का केली पाहिजे? आणि तिचा मुख्य गुणधर्म काय?’ या विषयांवर या केडर कॅम्पमध्ये दिवसभर विविध अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेत नव्याने जोडल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांना संस्थेची भूमिका, कार्यपद्धती आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संघटनात्मक पातळीवर करावयाच्या कामाची दिशा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विविध तालुक्यांचे तालुकाध्यक्ष आणि सचिव सहभागी होणार आहेत.

या केडर कॅम्पमध्ये ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेडिओ व टीव्ही विंगचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास बडे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते गगन मोहोत्रा तसेच महिला राष्ट्रीय संघटक सारिका पन्हाळकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारिता आणि तिचे भविष्य, तंत्रज्ञान तसेच बदलत्या काळानुसार निर्माण झालेली आव्हाने व संधी यावर विचारमंथन होणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्हाध्यक्षांकडून आपापल्या जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला जाणार असून पुढील धोरणे निश्चित केली जातील. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने काम करण्यासाठी या कॅम्पमधून संघटनेला नवी ऊर्जा, दिशा आणि सक्षम कार्यकर्त्यांची फळी मिळेल, असा विश्वास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे मराठवाडा अध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांनी व्यक्त केला. या केडर कॅम्पसाठी संघटनेच्या मराठवाडा कार्यकारिणीसह उर्दू विंग, सोशल मीडिया विंग, डिजिटल मीडिया विंग आणि साप्ताहिक विंगसह नांदेड येथील पदाधिकारी व सदस्यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.

Post Views: 1,511
Please Share
Previous Post

जगाचा पोशिंदाच उपाशी..!

Next Post

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ