जिंतूर : जिंतूर विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाजाचे नेते नानासाहेब राऊत, अविनाश काळे, तसेच बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र नागरे, माजी जिप, पंस सदस्य, सरपंच यांच्यासह अनेकांनी मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात मंगळवारी दुपारी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नेत्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, पक्षाचे सरचिटणीस आमदार संजय केणीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास
मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...




