देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 4, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद
Please Share

सर्वत्र सामसूम, ठिकठिकाणी दुचाकी फेऱ्या, जोरदार घोषणाबाजी

परभणी : मराठा आरक्षण संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज बांधवांनी गुरुवारी, ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुकारलेल्या बंदला परभणी शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

जिल्ह्यातील सर्वच तालुका शहराच्या ठिकाणी तसेच मोठ्या बाजारपेठातील गावांमध्ये व्यापार्‍यांनी आवाहनाला प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली. विशेषत: शहरातील सर्वच मुख्य रस्त्यावरील दुकाने, व्यापार पेठा, मोंढा भागात सकाळपासून सामसूम दिसून आली. बुधवारी जिल्हा पोलिस अधिक्षक कुमावत यांची सकल मराठा समाजाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन परभणी जिल्हा बंद संदर्भात निवेदन सादर केले होते.
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या काही बांधवांनी मोटारसायकल रॅली काढून व्यापार्‍यांना व्यवहार बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. विविध घटकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये शैक्षणिक संस्थांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. बंदमुळे दुपारी उशीरापर्यंत सर्वत्र शुकशुकाट होता.
मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, तसेच जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण तातडीने सोडविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे. परभणी जिल्ह्यात बंदला मिळालेला प्रतिसाद हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी असलेल्या एकजुटीचे आणि आंदोलनाला मिळणार्‍या व्यापक पाठिंब्याचे द्योतक असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

गुरुवारचे चाचणी पेपर शनिवारी

दरम्यान, जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाच्या वतीने जिल्हाभरातील सुमारे ३५० शाळांत गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी आयोजित इयत्ता पाचवी ते दहावीची प्रथम घटक चाचणीचे पेपर रद्द करण्यात आले. गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विषयाचे पेपर शनिवारी, ५ सप्टेंबररोजी होतील. तसेच ४ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विषयाचे पेपर निर्धारित वेळापत्रकानुसारच होतील. त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे संवर्धन मंडळांशी संलग्न शाळांनी कळविले आहे.

Post Views: 1,466
Please Share
Previous Post

गुणवत्तेची दयनीय स्थिती; ठोस उपाययोजना राबवा

Next Post

जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा

जिंतूर, सेलू तालुक्यात कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ