देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2025
in परभणी
0
कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू
Please Share

पाथरीजवळील घटना, दोन गंभीर जखमी; सेलू शहर, डासाळा गावावर शोककळा

सेलू जि.परभणी : श्रावणी सोमवार निमित्त सेलू येथील संकल्प अखंड हिंदू राष्ट्र समितीच्यावतीने आयोजित सेलूहून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे आलेल्या कावड यात्रेतील भाविक परतीच्या मार्गावर असताना पहाटे पाचच्या सुमारास कार थेट यात्रेत घुसली. या अपघातात दोन भाविक जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पाथरी-सेलू रस्त्यावरील खेडुळा पाटीवर सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता घडली. दहावीत शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश सुरेशराव शिंदे (वय १६, रा. दत्तनगर, सेलू) आणि एकनाथ गंगाधरराव गजमल (वय ५० रा. डासाळा, ता. सेलू) अशी मृतांची नावे आहेत. तर दोन गंभीर व दोन किरकोळ जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर सेलू येथे उपचार सुरू आहेत. श्रावण मासानिमित्त तीर्थक्षेत्र रामपुरी रत्नेश्वर येथील गोदावरीचे पाणी नेण्यासाठी सेलू तालुक्यातील भाविकांची कावड यात्रा रविवारी सायंकाळी सेलू येथील शिवतीर्थ परिसरातून रामपुरीकडे निघाली. रामपुरी येथील गोदावरी नदीतून गंगाजल घेऊन पहाटे तीन वाजता ही कावड यात्रा परत सेलूकडे निघाली होती. पाथरी – सेलू रस्त्यावर खेडुळा पाटीवर यात्रा आली असता, यात्रेसोबत असलेली झेस्ट कार एम एच ३ सीएच १२११ कारला आज्ञात वाहनाची धडक बसल्याने ती कार यात्रेत घुसून अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके , जैस्वाल, थोरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ नरके, सपोनि शिवसांभा स्वामी, विष्णू वाघ, परमेश्वर थोरे व सुरेश कदम यांनी धाव घेतली. मृतदेहांचे शवविच्छेदन पाथरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे आणि पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी सेलू येथील रेल्वे गेटवर या कावड यात्रेचे स्वागत करण्यासाठी सेलू शहरात मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती. भव्य मिरवणुकीनंतर या यात्रेची सांगता शंकरलिंग मंदिरात महाभिषेक व महाआरतीने होणार होती. मात्र, कावड यात्रा सेलूत पोहचण्यापूर्वीच अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण सेलू शहर, डासाळा गावावर शोककळा पसरली आहे.

Post Views: 1,100
Please Share
Previous Post

सतीश कुलकर्णी यांना ‘मुद्रा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

Next Post

सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध

सदाबहार गीतांनी सेलूकर मंत्रमुग्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ