देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा नांदेड

सतीश कुलकर्णी यांना ‘मुद्रा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2025
in नांदेड, परभणी, मराठवाडा
0
सतीश कुलकर्णी यांना ‘मुद्रा जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
Please Share

नांदेड जिल्हा मुद्रक संघाकडून सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार

परभणी/नांदेड : मुद्रण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पहिला ‘मुद्रा जीवन गौरव – २०२५’ पुरस्कार नांदेड येथील मयूर प्रिंटर्सचे सतीश कुलकर्णी यांना मान्यवरांच्या हस्ते रविवारी, १० ऑगस्ट रोजी सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने रविवारी नांदेड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजिण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर सत्कारमूर्ती सतीश कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष देवदत्त देशपांडे, नंदकुमार केशेटवार, भुमन्ना अक्रमवाड, श्रीहरी निलावार, सय्यद मौला, निमा कुळकर्णी आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानपत्र, पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ,ज्ञसन्मान चिन्ह आणि रोपटे असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी विविध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल मुद्रकांच्या गुणवंत पाल्यांच्या तसेच मुद्रक विजय चित्रवार, शिवाजी कोनापुरे, राजेंद्र शंकरपुरे यांचाही सत्कार करण्यात आला. श्री. इंगळे यांनी ‘लघुउद्योग आणि आर्थिक योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले. सन्मानपत्राचे वाचन शिवानंद सुरकुटवार यांनी केले. प्रास्ताविक श्री.देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मुगटकर यांनी केले. भारत गठ्ठेवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अभंग पुस्तकालयाच्या निमा कुळकर्णी, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, मुद्रक कुटुंबिय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.अयुब म.सरवर, प्रशांत बोडखे, अतुल बुरेवार, प्रशांत गुर्जर, शिवानंद सुरकुटवार, समीर कुलकर्णी, आनंद नादरे, किशन देशमुख, गणेश लोखंडे, अब्दुल वहाब रशीद, मारोती लकडे, अब्दुल रज्जाक, सदानंद देशमुख, ज्ञानेश्वर वारकड, अंकित अग्रवाल, लक्ष्मीकांत मुदिराज यांच्यासह जिल्हा मुद्रक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

पुरस्काराबद्दल कृतज्ञता करताना सतीश कुलकर्णी म्हणाले की, आज मुद्रणाचा वेग झपाट्याने वाढत आहे. स्पर्धा प्रचंड आहे. त्यासाठी मुद्रकांनी वेगळेपण आणि दर्जा जपण्यासाठी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. ताणतणावापासून दूर राहात, आपल्या व्यावसायिक आणि दैनंदिन कामात आनंद शोधला पाहिजे. कोटुंबिक जबाबदारी आणि आरोग्यभानदेखील जपावे. दरम्यान, विविध उपक्रमांसाठी दहा हजार रूपयांचा देणगी धनादेश जिल्हा संघाच्या अध्यक्षांकडे श्री.कुलकर्णी यांनी सुपुर्द केला.

Post Views: 1,223
Please Share
Previous Post

भीमराव कोकाटे यांचे बेमुदत उपोषण

Next Post

कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू

कावडयात्रेत कार घुसून दोन भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ