देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राहुल पाटील

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 15, 2025
in परभणी
0
अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राहुल पाटील
Please Share

परभणी : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ताई व मदतनीस या नेहमी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करतात. कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी समाजासाठी काम केले. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

डॉ. राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त (अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त) शिवसेना महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर मित्र मंडळाच्यावतीने अक्षदा मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. १४) आशा सेविका, अंगणवाडी ताई व मदतनीस यांना साडीवाटप व फराळ वाटप करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पाटील बोलत होते.

यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड. अशोक सोनी, व्यापारी महासंघाचे सूर्यकांत हाके, बंडू नाना सराफ, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. माधुरी क्षीरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रकल्प) रेखा माळंके, महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर, पोलीस अधीक्षक वीरेंद्रसिंह परदेशी, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. अंबिकाताई डहाळे यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.

पुढे बोलताना आमदार डॉ. पाटील म्हणाले, मराठवाड्यासह मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे परम कर्तव्य आहे. परंतु, वाढदिवस साध्या पद्धतीने उपक्रमशील कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प सर्व पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे मला याचा आनंद आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचा मानस असून येणाऱ्या काळात अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगार निर्माण करू. तरुणांना रोजगार, महिलांना स्वयंपूर्ण बनवणे, वृद्धांसाठी आनंददायी वातावरण देणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यावर आयुष्यभर भर राहील. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक डॉ. नावंदर यांनी प्रास्ताविक करताना आमदार डॉ. पाटील यांच्या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले तर आभार मकरंद कुलकर्णी यांनी मानले.

Post Views: 1,365
Please Share
Previous Post

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Next Post

सेवा संस्थेमार्फत पूरग्रस्तांना मदत कीट वाटप

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post

सेवा संस्थेमार्फत पूरग्रस्तांना मदत कीट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ