देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

गतिरोधक बसवा; अन्यथा तीव्र आंदोलन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 25, 2026
in परभणी
0
गतिरोधक बसवा; अन्यथा तीव्र आंदोलन
Please Share

सेलूतील व्यंकटेश्वर प्रतिष्ठानचा इशारा, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन

सेलू (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेली वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, तातडीने गतिरोधक बसवण्यात यावे, अशी मागणी श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले असून, योग्य पावले न उचलल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

शहरातील रायगड कॉर्नर ते परभणी रोड, नूतन महाविद्यालय ते बाबासाहेब मंदिर रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते वालूर नाका हे तिन्ही मार्ग अत्यंत रहदारीचे आहेत. या मार्गांवर ४ शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी वर्ग आणि मोठी नागरी वसाहत आहे. त्यामुळे येथे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वावर असतो. मात्र, अनेक दुचाकी व चारचाकी वाहनधारक या रस्त्यावरून अत्यंत बेदरकारपणे आणि वेगाने वाहने चालवत असल्याचे चित्र आहे.
या वेगवान वाहनांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, त्यात काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. या भागात विद्यार्थी मोठ्या संख्येने सायकलवरून ये-जा करतात. भरधाव वाहनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर, संबंधित तिन्ही मार्गांवर तात्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र जन आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी जयसिंग शेळके, गणेश शेवाळे, विनोद धापसे, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, पवन धुमाळ, आकाश इघवे, करण ढवळे आदि उपस्थित होते.

Post Views: 1,621
Please Share
Previous Post

२७ वर्षांनंतर परभणीतील पोलीस मित्र पुन्हा एकत्र

Next Post

‘एनएमएमएस’ परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
‘एनएमएमएस’ परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

'एनएमएमएस' परीक्षेत नूतन विद्यालयाचे ३४ विद्यार्थी उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पेरण्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

महायुतीचे सईद खान विजयी

महायुतीचे सईद खान विजयी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, पहिल्या पसंतीची २४२ मते मिळवून पटकावला विजय; महाविकास आघाडीचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते...

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सासूच्या दहाव्यासाठी आलेल्या जावायाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

मानवत तालुक्यातील रामपुरी बुद्रुक येथील घटना; अंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना मानवत : सासूच्या अंत्यविधीनंतर...

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

नूतन विद्यालयात योगासन प्रात्यक्षिके

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 22, 2026
0

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय व योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २१ जून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ