देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

‘राष्ट्रवादी’ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 20, 2026
in परभणी, मराठवाडा
0
‘राष्ट्रवादी’ला धक्का; प्रा.किरण सोनटक्के यांचा राजीनामा
Please Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा. किरण सोनटक्के यांचा राजीनामा

परभणी : ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा. किरण सोनटक्के यांनी, सोमवारी १९ जानेवारी रोजी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या २१ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रा.सोनटक्के यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

महापालिका आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने घेतलेली भूमिका ही विचारधारेशी विसंगत असल्याचा आरोप त्यांनी या राजीनामा पत्राद्वारे केला आहे.प्रा. सोनटक्के यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांना आपले राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या २१ वर्षांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख केला असून, या काळात त्यांनी शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचे म्हटले आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असतानाही, सध्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सोनटक्के यांनी म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीत पक्षाने घेतलेली भूमिका ही मूळ विचारधारेशी विसंगत होती आणि त्याचे परिणाम निकालातून स्पष्ट झाले आहेत. जनतेमध्ये पक्षाच्या भूमिकेबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला असून, दिवसेंदिवस होत असलेली पक्षाची बदनामी आणि राजकीय पडझड मनाला वेदना देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीतही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा तशीच विसंगत भूमिका घेतल्याने परभणीसह संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

भविष्यात पक्षाची नेमकी भूमिका काय असेल याबाबत स्पष्टता नसल्याने, कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा संभ्रम राहू नये म्हणून त्यांनी पदासोबतच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

Post Views: 2,331
Please Share
Previous Post

सेलूतील न्यू हायस्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश

न्यू हायस्कूल, शारदा विद्यालयाचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ