परभणी : परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.१६ प्रभागांतील ६५ जागांसाठी आतापर्यंत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष इच्छुकांनी मंगळवारी, ३० डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण २ हजार २७४ नामनिर्देशन पत्राची खरेदी केली. तसेच एकूण १ हजार २८ बेबाकी प्रमाणपत्रांचे आणि १ हजार १२८ शौचालय असल्याचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहेत. सोमवारी एकाच दिवशी ३५६ इच्छुकांनी अर्जांची खरेदी केली होती. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. बुधवारी या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर वैधरीत्या ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित केली जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....





