देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

सेलूतही ‘बुलढाणा अर्बन’ बंद होण्याची अफवा..

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 31, 2025
in मराठवाडा
0
सेलूतही ‘बुलढाणा अर्बन’ बंद होण्याची अफवा..
Please Share

सेलू शाखेसमोर खातेदारांची गर्दी, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

सेलू / प्रतिनिधी : बीड जिल्ह्यातील वडवणी व अन्य शाखा पाठोपाठ परभणी जिल्ह्यातील सेलू येथे बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने मोठी खळबळ उडाली. या अफवेमुळे खातेदार आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि गहाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळपासूनच सोसायटी शाखेसमोर गर्दी करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे परिसरात अफवांचे पेव फुटले असून खातेदारांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, खातेदारांचे पैसे सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन बुलढाणा अर्बन सोसायटी प्रशासनाने केले आहे.

मागील काही वर्षांत ज्ञानराधा पतसंस्थेसह काही मल्टीस्टेट बँक आणि क्रेडिट सोसायट्यांनी ठेवीदारांचे करोडो रुपये बुडवल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. याच दरम्यान, बुलढाणा अर्बन सोसायटीची सेलू शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरासह परिसरात पसरली आणि अनेक ठेवीदार आपले पैसे सुरक्षित काढण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शाखेसमोर पोहोचले. यामुळे खळबळ उडाली आहे. या आधीही बुलढाणा अर्बन सोसायटीबाबत अशीच अफवा पसरली होती. त्यावेळी खातेदारांना पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र, काही दिवसांतच ही अफवा दूर झाली होती.

व्यवहार पूर्णपणे सुरक्षित, अफवांवर विश्वास ठेवू नका

बुलढाणा अर्बन सोसायटीच्या परभणी जिल्ह्यासह इतर सर्व शाखांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. शाखेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या. सोसायटीचे सर्व व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. सोसायटी प्रशासनाने ठेवीदारांना आवाहन केले आहे की, आज सेलू शाखा रात्री ९ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहे. ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारच्अया फवेवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट सोसायटी शाखेशी संपर्क साधावा.

शाखेबाहेर वाहनांची गर्दी

सोसायटी शाखेत तसेच बाहेर खातेदारांनी गर्दी केली आहे. मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी झाली आहे. काही ठेवीदार खात्यातील सर्व रक्कम काढण्यावर भर देत होते, तर काहींनी गोल्ड लोनची परतफेड करून गहाण ठेवलेले दागिने परत घेण्याचा आग्रह करीत असल्याचे समजते. व्यवहारामध्ये अचानक झालेल्या या वाढीमुळे सोसायटी कर्मचाऱ्यांवरही उत्तरे देताना नाकीनऊ येत असून त्यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Post Views: 1,942
Please Share
Previous Post

परभणी महापालिका : उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी

Next Post

सेलू नगरपालिका : काँग्रेस गटनेतेपदी पवन आडळकर

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू नगरपालिका : काँग्रेस गटनेतेपदी पवन आडळकर

सेलू नगरपालिका : काँग्रेस गटनेतेपदी पवन आडळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ