देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 20, 2025
in परभणी
0
सेलूत मतमोजणीची तयारी पूर्ण
Please Share

पहिला निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत, १३ टेबलवर होणार प्रक्रिया; नगराध्यक्षांसह १३ प्रभागांच्या निकालाकडे लक्ष

सेलू : सेलू नगर पालिकेच्या नगराध्यक्षांसह १३ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी, २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण केली असून, पहिला निकाल सकाळी ११ वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालामुळे उमेदवारांसह मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

७२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मतमोजणीसाठी एकूण १३ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, एका टेबलवर ३ ते ४ कर्मचारी नियुक्त केले आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण ७२ कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात असेल. मतमोजणीच्या ५ फेऱ्या होणार असून, प्रभागनिहाय निकालासोबतच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मतेही जाहीर केली जातील. सर्वात शेवटी नगराध्यक्षपदाचा अधिकृत निकाल जाहीर होईल, अशी माहिती निवडणूक विभागाचे गजानन इनामदार यांनी दिली.

पोलिसांचा कडक बंदोबस्त

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ उपविभागीय पोलीस अधिकारी, १ पोलीस निरीक्षक, ११ उपनिरीक्षक, ६३ पोलीस अंमलदार आणि १०० गृहरक्षक दलाचे जवान असा एकूण २०० जणांचा फौजफाटा तैनात असेल, अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली.

धक्कादायक निकालाचे संकेत

नगरसेवक पदाच्या २६ जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक पार पडली. मतदानाचा वाढलेला टक्का आणि चुरशीच्या लढतींमुळे विजयाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भाजप, काँग्रेस शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनी आपापल्या विजयाचे दावे केले आहेत. काही प्रभागांमधील अटीतटीच्या लढतींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Post Views: 1,619
Please Share
Previous Post

मनाच्या प्रसन्नतेसाठी शब्द जपून वापरावेत

Next Post

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ