देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना विविध सेवांचा लाभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 7, 2026
in परभणी
0
समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना विविध सेवांचा लाभ
Please Share

परभणी : “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (टप्पा-१)” अंतर्गत परभणी तालुक्यातील ग्रामीण मंडळातील मौजे ब्राह्मणगाव येथे शनिवारी, ७ मार्च रोजी समाधान शिबिर संपन्न झाले.

या शिबिरामध्ये महसूल विभागासह महिला व बाल विकास विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग आदी विविध विभागांनी सहभागी होऊन नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय सेवांचा लाभ घेतला.शिबिर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मणगावच्या सरपंच गीता काळदाते या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते. कार्यक्रमास तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, पंचायत समिती सदस्य दिलीप काळदाते, जिल्हा भूमी अधीक्षक श्री. चौधरी गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, तालुका कृषी अधिकारी विजय नांदे, उपाधीक्षक, भूमी अभिलेख सुनील मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, दुय्यम निबंधक भास्कर घुगे, नायब तहसीलदारडॉ. राजकुमार राठोड उपस्थित होते. याशिवाय तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत ३१ फेरफार प्रकरणे निकाली काढण्यात आली, ७/१२ दुरुस्ती संदर्भात १० अर्ज स्वीकारण्यात आले, ६५ डिजिटल ७/१२ उतारे वितरित करण्यात आले, ६५ आठ-अ उतारे उपलब्ध करून देण्यात आले, १८८ विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले,तसेच २७ अर्ज सिंगल विंडो प्रणालीद्वारे निकाली काढण्यात आले. याशिवाय विविध विभागांमार्फत एकूण ६४७ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला, तसेच लेक लाडकी, लाडकी बहीण व बाल संगोपन योजना यांसारख्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. पुरवठा विभाग व संजय गांधी निराधार योजनेमार्फत ५५ लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. या समाधान शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक व तत्काळ पद्धतीने मिळाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.सदर शिबिरामध्ये नागरिकांना खालील विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या — प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ व ८अ वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमिलेयर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) बाबत मार्गदर्शन, सनद प्रकरणांची माहिती, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणांचा निपटारा, घरासाठी नवीन पट्टा व ई-मोजणी अर्ज, अंगणवाडी व पीएम किसान नोंदणी, शिधापत्रिका वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

Post Views: 1,638
Please Share
Previous Post

सेलूतील ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास सर्व मदत करू

Next Post

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार

शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ