मानवत येथील निवड चाचणीत पटकावला प्रथम क्रमांक
परभणी : ॲथलेटिक्स राज्यस्तरीय निवड चाचणी मॅरेथॉन स्पर्धेत वरद दत्तात्रय भिसे याने मॅरेथॉन स्पर्धेत (६०० मी. धावणे) (१६ वर्षांखालील गट) प्रथम क्रमांक मिळवला आहे. या घवघवीत यशामुळे डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे दिनांक २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली असून तो परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.
के. के. एम. कॉलेज मानवत येथे आयोजित निवड चाचणीत त्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला त्याचे वडील राष्ट्रीय कबड्डीपटू दत्तात्रय भिसे आणि क्रीडाशिक्षक यमनाजी भालशंकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय बाल विद्या मंदिर परभणीचे मुख्याध्यापक शेंडगे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वरदच्या या कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रासह सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.





