विद्यार्थ्यांची कल्पकता कौतुकास्पद : रामनाना पाटील यांचे प्रतिपादन, प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम
सेलू : माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात विद्यार्थ्यांची आकलन व कल्पनाशक्ती कौतुकास्पद आहे. गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या या सद्गुणांचा उपयोग राष्ट्रभक्ती आणि देशसेवेसाठी करावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रामनाना पाटील यांनी केले.
येथील राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विद्यार्थी निर्मित पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सोमवार, २६ जानेवारी रोजी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीवल्लभ लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी संस्था सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष सुयश पटवारी, मराठवाडा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष शिवनारायण मालाणी, संचालक मुंजाभाऊ भिसे, सुनील डख, प्रफुल्लकुमार बिनायके, एकनाथराव पौळ, नंदकिशोर बहिवाल, प्रल्हादराव कान्हेकर, चंद्रशेखर नावाडे, एम. एन. जोशी, मुख्याध्यापक डी. डी. शिंदे, मुख्याध्यापिका उषा कामठे आणि श्रीराम कान्हेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्याची व पोस्टर्सची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भरत रोडगे, अर्चना फोपसे, सोमेश शिंदे आणि ब्रम्हानंद मोगल यांचे मार्गदर्शन लाभले. याच प्रसंगी चित्रकला परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व कलाध्यापक रोहीदास चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिमान पाईकराव यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी तर आभार संदीप जुमडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद देवधर, नानासाहेब भदर्गे, विजय अंभुरे, भारती मुळे, फुलारी आणि साडेगावकर यांनी परिश्रम घेतले.





