देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

श्रावण सोमवारी भक्तिमय भजनांनी दुमदुमला परिसर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 3, 2026
in वाशिम
0
श्रावण सोमवारी भक्तिमय भजनांनी दुमदुमला परिसर
Please Share

भजनी मंडळांच्या संतवाणी, अभंग आणि धार्मिक भजनांनी रंगले वातावरण

फुलचंद भगत/वाशिम :⁠- पवित्र श्रावण सोमवार व एकादशीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती, मंगरूळपीर तसेच परिसरातील विविध ठिकाणी आयोजित धार्मिक व भजन कार्यक्रमांना भेटी देऊन उत्स्फूर्त सहभाग दर्शविण्यात आला. श्रावण सोमवारच्या पवित्र पार्श्वभूमीवर आयोजित या भक्तिमय कार्यक्रमांमुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि हरिनामाचा मंगलमय गजर अनुभवायला मिळाला.

या निमित्ताने मुंगसाजी महाराज महिला भजनी मंडळ, कोळंबी, नाथ महाराज भजनी मंडळ, मंगरूळपीर, विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ, मंगरूळपीर तसेच गजानन महाराज भजनी मंडळ, लाठी आदी अनेक भजनी मंडळांच्या कार्यक्रमांना भेट देण्यात आली.या भक्तिमय कार्यक्रमांमध्ये सहभागी होत विविध भक्तिपर भजने, अभंग व संतवाणीचे गायन करण्यात आले.

हरिनामाच्या अखंड गजराने परिसर दुमदुमून गेला, तर उपस्थित भाविकांनी भक्तिरसाचा मनमुराद आनंद घेतला. संतांच्या विचारांचा जागर करीत भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.या प्रसंगी वाशिम जिल्हा भजनी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शंकरराव भांडेकर यांनी विविध भजनी मंडळांना भेट देऊन कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. विविध मंडळांतील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी संतपरंपरा, धार्मिक संस्कार आणि भजन संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.यावेळी त्यांच्यासोबत राजेश भाऊ बारड, भाऊराव सुर्वे, महेंद्र सावके, विठ्ठल सुर्वे व रामेश्वर सावके उपस्थित होते. विविध भजनी मंडळांच्या सदस्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवून भजन-कीर्तनाच्या माध्यमातून आपला भक्तिभाव व्यक्त केला.विशेष म्हणजे, मुंगसाजी महाराज महिला भजनी मंडळाच्या वतीने सुधाकर शंकरराव भांडेकर तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे कार्यक्रमातील वातावरण अधिक उत्साहपूर्ण व मंगलमय झाले.श्रावण सोमवार आणि एकादशीच्या पवित्र पार्श्वभूमीवर विविध भजनी मंडळांना दिलेल्या भेटी व धार्मिक भजनातील उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती, संतवाणी आणि विठ्ठलनामाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. अभंगांच्या सुरेल मैफली आणि हरिनामाच्या गजराने हा धार्मिक सोहळा अधिकच भक्तिमय वातावरणात साजरा झाला.

Post Views: 1,245
Please Share
Previous Post

गणेशोत्सवासाठी परवानगी अर्ज आता ऑनलाईन

Next Post

महादेवाचा जयघोष… कावड यात्रेचा अनवाणी पायांनी केलेला भक्तिमय प्रवास

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महादेवाचा जयघोष… कावड यात्रेचा अनवाणी पायांनी केलेला भक्तिमय प्रवास

महादेवाचा जयघोष... कावड यात्रेचा अनवाणी पायांनी केलेला भक्तिमय प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ