देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्री कालिकादेवीचा वार्षिकोत्सव उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 16, 2025
in परभणी
0
श्री कालिकादेवीचा वार्षिकोत्सव उत्साहात
Please Share

सेलूत रक्तदान शिबीरासह विविध कार्यक्रम

सेलू : सेलू येथील विद्यानगर भागातील श्री कालिका देवी मंदिर संस्थानचा २८ वा वार्षिकोत्सव मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
श्री कालिका देवी सेवा मंडळाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात धार्मिक विधींसोबतच सामाजिक उपक्रमांवरही भर देण्यात आला होता.
उत्सवाची सुरुवात सकाळी ८ वाजता देवीच्या अभिषेक महापूजेने झाली. दुपारी आयोजित सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री कालिका देवी मंदिर व सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक कासार होते.प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर, ज्ञानेश्वरी पारायण फंड सोहळ्याचे अध्यक्ष अरुणराव वेळापूरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के.पी. चौधरी गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, महिला मंडळ अध्यक्ष वंदना खरावणे, विलासराव वानरे, कैलास वानरे, वसंतराव कानडे, सतीश तळणीकर, मंगेश विभुते आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थानच्या वतीने मान्यवरांचा तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

▫️मान्यवरांचा सहभाग

साईबाबा बॅंकचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हेमंतराव आडळकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे प्रभाकर सुरवसे, मिलिंद सावंत, संदीप लहाने, पवन आडळकर तसेच माजी नगरसेवक यांनी महोत्सवास भेट देऊन दर्शन घेत सहभाग घेतला. देवीची आरती झाल्यानंतर महाप्रसादासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महोत्सवानिमित्त माधवराव वानरे यांनी मंदिरास एक आरसीसी रूमचे बांधकाम अर्पण केले. शंकरराव हेलसकर, रामप्रसाद वराडे आणि डॉ.श्रीकांत दहीभाते यांनी अन्नदानसेवा तसेच अल्पोपहार व चहापानसेवा लक्ष्मण व मुंजा शेटे, बालाजी वानरे, चंद्रकांतराव सासवडे, धोंडीराम ढोके, रमेश ढाके, निखिल खोमाडे, पंकज ढोके, रविराज वानरे आणि प्रेमचंद वानरे यांनी, तर जीवनराव खरावणे यांनी जलसेवा दिली. निशुल्क स्वयंपाक सेवा शिवाजीराव शिनगारे यांनी पार पाडली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक कासार, उपाध्यक्ष रामप्रसाद वराडे व अशोक वानरे, सचिव गजानन हेलसकर, सहसचिव अनंतकुमार विश्वंभर, प्रभाकर खरावणे, शंकरराव हेलसकर, गोपाळराव सासवडे, बाबासाहेब हेलसकर, सुनिताताई हेलसकर, माधवराव वानरे, धर्मकुमार वानरे, जीवन खरावणे, गोपाळराव हेलसकर, दिलीप कुंभकर्ण, प्रभाकर ढोके, मिराताई हालगे, शोभाताई वानरे, वंदनाताई खरावणे, डॉ.दीपक सासवडे, नितीन वराडे आणि कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच नवयुवक व महिला मंडळाचे मोलाचे सहकार्य केले.

▫️शिबिरात ५३ दात्यांचे रक्तदान

वार्षिक उत्सवानिमित्ताने सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ५३ जणांनी रक्तदान केले. रक्त तपासणी तसेच बी.पी.आणि शुगर तपासणी करण्यात आली. रक्तसंकलनसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीचे ओंकार शिंदे, प्रतीक भराडे, नितीन लीपणे, रामा ढेंगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे गणेश मुळे, मोहम्मद सलीम, शुभम अंभोरे, मारोती सिरगजवार, मानसिक आरोग्य विभाग समन्वयक दीपक काळदाते आदींनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,746
Please Share
Previous Post

अध्यात्मिकतेला सामाजिक कार्याची जोड हवी

Next Post

पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’

पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ