देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 16, 2025
in परभणी
0
पोदार जंबो किड्समध्ये ‘आनंद नगरी’
Please Share

विद्यार्थ्यांच्या खाद्य स्टॉल्समधून उमजले व्यवहाराचे गणित

जिंतूर/प्रतिनिधी : जिंतूर शहरातील गुरुदेव नगर येथील पोदार जंबो किड्समध्ये विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभव मिळावा, या उद्देशाने ‘आनंद नगरी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी पार पडलेल्या या उपक्रमात चिमुकल्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावून पालकांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अनुभवातून शिक्षण देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे शहरात मोठे कौतुक होत आहे.

या फन फेअरमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने उभारलेल्या स्टॉल्सवर चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. केवळ खाद्यपदार्थांची विक्री न करता, त्यामागील तयारी, साहित्याचे मोजमाप, आर्थिक व्यवहार आणि ग्राहकांशी साधला जाणारा संवाद यातून विद्यार्थ्यांच्या गणिती संकल्पना आणि सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली. स्वच्छतेचे भान राखून करण्यात आलेले सादरीकरण हा या उपक्रमाचा विशेष भाग ठरला.

रंगीबेरंगी सजावटीने सजलेल्या शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या उत्साहाने चैतन्य पसरले होते. शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद वृद्धिंगत करणाऱ्या या सोहळ्यात पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. अशा उपक्रमांमुळे मुलांमध्ये स्वावलंबन, जबाबदारी आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याची भावना अनेक पालकांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी प्राचार्य आशा दराडे यांनी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कौतुक केले. आनंद नगरीसारख्या उपक्रमांमुळे मुलांचे शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि रंजक होते, असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळेच ही आनंद नगरी खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

Post Views: 1,519
Please Share
Previous Post

श्री कालिकादेवीचा वार्षिकोत्सव उत्साहात

Next Post

बालवैज्ञानिक स्पर्धेत ‘नूतन’ चे घवघवीत यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बालवैज्ञानिक स्पर्धेत 'नूतन' चे घवघवीत यश

बालवैज्ञानिक स्पर्धेत 'नूतन' चे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ