देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता
Please Share

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती

सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या वतीने ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सांगता शुक्रवार, १९ जूनरोजी भक्तीमय वातावरणात झाली. यानिमित्ताने श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर ते साई मंदिरादरम्यान काढलेल्या भव्य ग्रंथदिंडीने आणि जागोजागी सादर सजीव देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले.

दिंडीची सुरुवात ग्रंथ व पालखी पूजनाने झाली. रथामध्ये कथा प्रवक्ते पद्मनाभ महाराज व्यास, संहिता वाचक गोविंदगुरू जोशी आसनस्थ होते. दिंडी मार्गावर भालचंद्र गांजापूरकर, शशिकांत देशपांडे, कीर्ती राऊत यांच्या संकल्पनेतून विठ्ठल-रूक्मीणी, श्रीकृष्ण-राधा, नृसिंह-हिरण्यकश्यपू यांच्या सजीव देखावे आकर्षण ठरले. स्नेहल जाधव, आरती कडवे, सिध्द आवटे, भाग्यश्री रत्नपारखी, अनया ढाकणे, स्वरा देशपांडे या विद्यार्थ्यांनी हे देखावे साकारले. पांडुरंग पाटणकर, डॉ.शरद ठाकर, माधव गव्हाणे, अनंत मोगल यांनी सुरेख रांगोळी काढली होती.

कथेच्या प्रारंभी सच्चिदानंद डाखोरे, इशिता अतुल कुलकर्णी यांनी भक्तीगीत गायले. शंतनू महाराज पाठक, शुभदा गोळेगावर यांनी मनोगत व्यक्त केले. आयोजक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. सूत्रसंचालन प्रकाश कुरूंदकर, अनिल रत्नपारखी यांनी केले. महाप्रसादाने सांगता झाली. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

सकारात्मक विचारातूनच जीवनात आनंद : कथा सांगताप्रसंगी पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की, आपण डोळ्यांनी जे पाहातो त्याचा मनावर अधिक प्रभाव पडतो, म्हणून चांगले तेच पाहिले पाहिजे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन त्याचे विचार कसे आहेत यावरून होते. आपला स्वभाव चांगला होण्यासाठी नेहमी चांगले चिंतन करावे. ज्ञान संपादन करून गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. सकारात्मक विचारच सुखी, आनंदी जीवनाचे शिल्पकार असतात.

Post Views: 1,537
Please Share
Previous Post

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Next Post

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ