देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

श्रीजगदंबादेवी नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रम

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 27, 2025
in परभणी
0
श्रीजगदंबादेवी नवरात्रौत्सवात विविध कार्यक्रम
Please Share

तिडी पिंपळगावात देवी भागवत, कीर्तनांसह धार्मिक कार्यक्रम

सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील तिडी (देवी) पिंपळगाव येथील प्राचीन श्री जगदंबा देवी मंदिरात यंदा देवी भागवत संगीत कथा आणि भव्य कीर्तन सोहळ्यासह नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांना भाविकांचा मोठा प्रतिसाद आहे. दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी होत आहे.

२२ सप्टेंबरपासून उत्सवाला सुरुवात झाली असून, १ ऑक्टोबर रोजी सांगता आहे. दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत अनंत महाराज बेलगावकर देवी भागवत कथेचे सुश्राव्य निरूपण करीत आहेत. संहिता वाचक म्हणून दिलीप महाराज पुणेकर यांचे सहकार्य आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने दररोज रात्री ८ ते १० या वेळेत हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भागवत महाराज शिंदे मानोलीकर, विनोदाचार्य भरत महाराज जोगी परळीकर, बाळू महाराज पिंपळगावकर, महादेव महाराज इरळदकर, हरिभाऊ महाराज वायाळ पांगरी, स्वामी मनिषानंद महाराज यांचे शिष्य आचार्य स्वामी राघव चैतन्य महाराज, अच्युत महाराज दस्तापुरकर, भागवताचार्य प्रज्ञाचक्षु सखाराम महाराज कुपटेकर आणि शिवा महाराज सुकळीकर यांसारख्या नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आहे. १ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० ते १२ या वेळेत आचार्य १००८ स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज (कोल्हा आश्रम) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

विविध कार्यक्रम

महोत्सवामध्ये दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ आणि सायंकाळी ५ ते ६ देवीची आरती, सायंकाळी. ६ ते ७ हरिपाठ आहे. विविध कार्यक्रमांत मधुकर रासवे, मुंजाभाऊ भागवत व महीला भजनी मंडळ, जिजाभाऊ जोगदंड, खंडेराय घुमरे, लक्ष्मण इंगळे, वैजनाथ पांडे, बोठे बाबा, खंडु काका घुमरे आणि भजनी मंडळ यांचा पुढाकार आहे. २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत होमहवन कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याची पुर्ण आहुती पुरोहित आचार्य लक्ष्मीकांत गुरुजी वझुरकर (चेतुवेदेश्वर धाम सावरगाव) यांच्या हस्ते होईल.

महोत्सवामध्ये दररोज सकाळ-सायंकाळ अन्नदान सेवा सुरू आहे. यासाठी बाबासाहेब घुमरे, दत्तात्रय जोगदंड परिवार, विलास शिवाजीराव घुमरे, शरद बाबुराव जोगदंड, संदिप घुमरे, प्रणव घुमरे, योगेश मगर, मधुकर रासवे, सतिष घुमरे, भगवान घुमरे, ज्ञानेश्वर जोगदंड, शिवाजी जाधव, तुकाराम जोगदंड, विठ्ठल जोगदंड, दत्ता जोगदंड, कल्याणराव जोगदंड, मंकेश जोगदंड, विष्णुनाना जोगदंड, तुकाराम जोगदंड, दत्तराव मगर, अंबादासराव नायबळ, माऊली रासवे, बाळु घुमरे, डिगांबर रासवे, श्री प्रसाद, एकतारी भजनी मंडळ पिंपळगाव, पोंढे परिवार, ज्ञानोबा सुंदरराव जोगदंड, ज्ञानोबा राऊत, केशव पौळ, गायनाचार्य गणेश महाराज वाघमारे, आकाश महाराज कदम, बाबासाहेब जोगदंड, विश्वनाथ जोगदंड, दत्ता घुमरे, उध्दवराव घुमरे, बाबासाहेब जोगदंड, हनुमान चाळक, मृदंगाचार्य राम महाराज गायकवाड, पांडुरंग धर्मे, कचरूमामा निर्मळ, शर्माजी तसेच तिडी पिंपळगाव, झोडगाव, धामणगाव, मानोली, रेणाखळी भजनी मंडळी आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जगदंबा देवी संस्थानचे कार्यकारी मंडळ, व्यवस्थापक आणि गावकऱ्यांनी केले आहे.

Post Views: 1,255
Please Share
Previous Post

परभणी जिल्ह्यात २० मंडळात अतिवृष्टी

Next Post

श्रीरेणुकाजगदंबा दर्शनयात्रेला सुरुवात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीरेणुकाजगदंबा दर्शनयात्रेला सुरुवात

श्रीरेणुकाजगदंबा दर्शनयात्रेला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ