
श्रीमती सरस्वतीबाई इंग्लिश स्कूल येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव व शिक्षक दिन उत्साहात, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
फुलचंद भगत, वाशिम :- विविध क्षेत्रात कलागुणांचा वाव व अनेक कार्यक्रमाचे आयोजन या संस्थेअंतर्गत होत असतात तसेच शेलूबाजार येथील गजानन महाराज मंदिराजवळ, कारंजा रोड परिसरातील श्रीमती सरस्वतीबाई इंग्लिश स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव व शिक्षक दिन विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वगुण व जबाबदारीची भावना निर्माण व्हावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने शाळेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित आकर्षक चित्रे व व्यंगचित्रे साकारून आपल्या कलात्मकतेचे दर्शन घडविले. तसेच श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
आम्हीच शिक्षक-शिक्षिका!’ उपक्रम ठरला विशेष आकर्षण
शिक्षक दिनानिमित्त राबविण्यात आलेला ‘आज आम्हीच शिक्षक-शिक्षिका आहोत’ हा अभिनव उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शिक्षकांची भूमिका साकारली आणि वर्गात इतर विद्यार्थ्यांना विविध विषयांचे अध्यापन केले.सदाशिव लांभाडे, पूर्वा गवारगुरु, गौरव राऊत, योगी राऊत, संस्कृती राऊत, संबोधी पारवे, धनश्री राऊत, अक्षरा राऊत अशा अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिकांची भूमिका प्रभावीपणे पार पाडत आपल्या सहाध्यायी विद्यार्थ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी वर्गासमोर उभे राहून फळ्यावर विषय मांडणे, प्रश्न विचारणे, विद्यार्थ्यांकडून उत्तरे घेणे आणि विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगणे अशा विविध पद्धतींचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांची जबाबदारी, संयम, नियोजन, विषयाचे ज्ञान आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. शिक्षकाची भूमिका साकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी हा अनुभव आनंददायी व प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला व्यासपीठ
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व कलात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कौशल्य व गुणवत्ता सादर केली.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सर्जनशीलता आणि सकारात्मक स्पर्धात्मक भावना विकसित होण्यास मदत होत असल्याचे दिसून आले.*विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर शाळेचा भर*श्रीमती सरस्वतीबाई इंग्लिश स्कूल, गजानन महाराज मंदिराजवळ, कारंजा रोड, शेलूबाजारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच सांस्कृतिक, क्रीडा, कला आणि कौशल्याधारित विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर शाळेचा विशेष भर आहे.श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, अध्यात्म, शिक्षकांविषयी आदर तसेच जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक कलाकृती, नृत्य सादरीकरण, विविध स्पर्धा आणि शिक्षकांची भूमिका साकारण्याच्या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे उपस्थितांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास, त्यांची सर्जनशीलता आणि अध्यापनातील उत्साह यामुळे ‘आज आम्हीच शिक्षक!’ हा उपक्रम विशेष संस्मरणीय ठरला.



