शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर होणार मंथन; मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार
सेलू : शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन (मुप्टा) शाखा सेलूच्या वतीने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा उद्या रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सेलू येथील अक्षदा मंगल कार्यालय सभागृहात पार पडणार आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी सेलूचे नगराध्यक्ष मिलींद दादा सावंत हे उपस्थित राहणार असून मुप्टा संघटनेचे संस्थापक तथा सचिव प्रा. सुनिल मगरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.याप्रसंगी मुप्टा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संभाजी वाघमारे, विना अनुदानित विभागाचे राज्यध्यक्ष शिवराम मस्के, केंद्रीय कार्यकारणी सदस्य शांतीलींग काळे आणि परभणी जिल्हाध्यक्ष माधव लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.शिक्षकांच्या हक्काच्या मागण्या आणि विविध अडचणींवर मात करण्यासाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याने तालुक्यातील शिक्षकांनी या सहविचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुप्टा शिक्षक संघटना सेलू यांच्या वतीने करण्यात आले आहे.





