देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
April 5, 2026
in परभणी
0
तारूण्यातच गाथा, ज्ञानेश्वरी वाचा
Please Share

श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांचे प्रतिपादन; पसायदान प्रवचनमालेचा झाला समारोप, सेलूमध्ये श्रोत्यांची मोठी उपस्थिती

सेलू : मानवाला जेव्हा आयुष्याचा शेवट येतो तेव्हा खरा सुखाचा मार्ग कळतो, परंतु तेव्हा वेळ गेलेली असते. म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर संत मार्गाला लागल्यास आयुष्यातील खरा सुखाचा मार्ग सापडेल. अगदी तरुण्यातच ज्ञानेश्वरी वाचावी, तर आपल्याला खऱ्या सुखाचा मार्ग सापडेल, असे प्रतिपादन श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

येथील वसंत प्रतिष्ठान व खारकर परिवाराच्या वतीने गुरुवार २ एप्रिल ते शनिवार ४ एप्रिल दरम्यान पसायदान या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले होते. येथील साईबाबा मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील प्रसिद्ध श्रीगुरू चैतन्य महाराज देगलूकर यांनी आज ४ एप्रिल रोजी शेवटचे पुष्प गुंफले. यावर्षी किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिन्ही लोकी, भजिजो आदीपुरुखी, अखंडित या ओवीवर त्यांनी प्रवचन दिले.पुढे बोलताना देगलूरकर महाराज म्हणाले की, विषय सुखात सर्व मानव अडकलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष म्हणजे पुरुषार्थ नाही, तर भ्रमजन्य सुखाला अंतिम मानू नये. विषय सुख हे भ्रामक आहे. यामुळे पसायदानात सकळ मानव जातीच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वरांनी मागणं मागितलं आहे. यामुळे लहानपणापासून सर्वांनी पसायदान आणि ज्ञानेश्वरी, गाथा वाचायला हव्यात, तर भ्रामक सुखापेक्षा खऱ्या सुखाचा अर्थ आपल्याला कळेल. एकदा भ्रामक सुखाला खरे सुख मानले तर माणूस त्याकडे जास्त ओढवतो आणि त्यातून दुःख मिळत असते. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी हे मागणं म्हणजे पसायदानाचा गाभा आहे. संत ज्ञानेश्वरांनी या ओवीच्या माध्यमातून पसायदानाची मध्यवर्ती संकल्पना मांडली आहे.

पसायदान प्रवचनमालेचे हे ७ वे वर्ष आहे. आज यावर्षीच्या प्रवचनाची सांगता झाली. सद्गुरू पूजन वसंत प्रतिष्ठानचे महेशराव खारकर व ॲड. उमेशराव खारकर यांनी केले. प्रवचनाचा ऋणनिर्देश ॲड. उमेशराव खारकर यांनी केला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी जागा उपलब्ध केली तसेच साथसंगत करणाऱ्या सर्वांचे आभार ॲड. खारकर यांनी मानले. अभंग गायन सच्चिदानंद डाखोरे, तबला गिरीश दीक्षित, हार्मोनियम शंतनू पाठक, टाळ प्रकाश सुरवसे यांनी साथ दिली. सूत्रसंचालन संजय पिंपळगावकर यांनी केले.

सामुहिक पुरूषार्थाचे गाव

शहरातील सर्व मतभेद विसरून सर्वच मंडळी सर्वच कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी सतत धडपडत असतात. मराठवाड्यातील जेष्ठ पत्रकार दिवंगत अनंतराव भालेराव यांनी सेलू शहर हे सामूहिक पुरुषार्थाचे गाव असल्याचे बोलून दाखवले होते. अतिशय मोठ्या व्यक्तीने दिलेली ही मोठी उपाधी शहराला आजही लागू होते. त्याचे कारण शुक्रवारी प्रवचन मध्यावर आले असताना मंडपात आलेल्या एका महिला भाविकाला, सेलू शहराचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी स्वतः उठून खुर्ची दिली. पद, प्रतिष्ठा ही आपल्या वर्तनातून दाखवण्याचे औदार्य सेलू मधील नेत्यांमध्ये आहे हे सिद्ध झाले. जनसामान्यांमुळे मिळालेले पद हे जनतेसाठी वापरावे हेच या कृतीतून दिसल्याने नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या कृतीचे कौतुक झाले. असं हे असामान्यातील सामान्यपण कायम पहावयास मिळत असल्याने सेलू शहराच्या इतिहासातील कोणताही छोटा मोठा सोहळा पूर्णपणे यशस्वी होतो. मराठवाड्याचे पुणे आणि सामूहिक पुरुषार्थाचे गाव म्हणून संबोधले जाणारे सेलू शहर आजही त्यासाठी पाईक आहे असेच म्हणावे लागेल.

Post Views: 1,700
Please Share
Previous Post

साईबाबा बँकेचा ४२१ कोटींचा विक्रमी व्यवसाय

Next Post

क्युरियस, फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
क्युरियस, फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ

क्युरियस, फिनकिड्स शाळेत पदवीदान समारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ