परभणी : अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी पोक्सो कायदासह अन्य गंभीर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आलेला सेलू येथील नूतन विद्यालयात कार्यरत आरोपी शिक्षक संतोष बबनराव मलसटवाड याच्यावर संस्थेने निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांनी बुधवारी, ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मलसटवाड याच्यावरील निलंबनाच्या कारवाईची माहिती दिली आहे. शिक्षक संतोष मलसटवाड याला गंभीर गुन्ह्यांसाठी सेलू पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलमसह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सेलू पोलिसाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर नूतन विद्यालयाच्या शालेय समितीची बैठक तातडीने आयोजित करण्यात आली. या बैठकीत संतोष मलसटवाड याने केलेल्या निंदनीय कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि या घटनेची गंभीर नोंद घेत मलसटवाड याला निलंबित करण्याचा ठराव एकमताने संमत केला आहे, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा
प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....




