देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल मिळणार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 10, 2026
in परभणी
0
ट्रॅक्टरसाठी १०० लिटरपर्यंत डिझेल मिळणार
Please Share

प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागतीच्या कामांना गती; अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक

परभणी : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मे व जून महिन्यात शेती मशागतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतात. या काळात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतीच्या मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी एकावेळी गरजेनुसार जास्तीत जास्त १०० लिटरपर्यंत डिझेल पेट्रोल पंपावरून घेऊन जाण्यास अटी व शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.

पेट्रोलियम अधिनियम १९३४ आणि पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, शेती कामाची गरज लक्षात घेऊन हे इंधन दिले जाईल. मात्र, हे डिझेल फक्त मान्यताप्राप्त धातूच्या किंवा जाड प्लास्टिकच्या ‘एप्रुव्हड कंटेनर’मध्येच वाहून नेता येईल. प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये डिझेल देण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

या अटींचे करावे लागेल पालन: डिझेल साठवणुकीसाठी स्टील किंवा लोखंडी कंटेनरचा वापर करणे बंधनकारक असून त्यात किमान ५ टक्के रिकामी जागा ठेवणे आवश्यक आहे. साठवणुकीची जागा हवेशीर असावी आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर असावी. तसेच संबंधित ठिकाणी ‘धूम्रपान निषेध’ व ‘आगीपासून सावध’ असे फलक लावणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे: पेट्रोल पंपावरून डिझेल घेताना शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

  • [Aadhaar Redacted]
  • ॲग्री स्टॅक क्रमांक
  • ७/१२ उतारा व नमुना ८-अ
  • ट्रॅक्टरचे आरसी बुक

पेट्रोल पंप चालकांनी एकदा डिझेल दिल्यानंतर पुढील पुरवठा किमान १५ दिवसांच्या अंतराने करावा. अशा विक्रीची स्वतंत्र नोंद नाव, मोबाईल क्रमांक व कारणासह ठेवणे तसेच सीसीटीव्ही फुटेज जतन करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिला आहे. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

Post Views: 1,543
Please Share
Previous Post

वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे आपली सामूहिक जबाबदारी – डॉ. रामेश्वर नाईक

Next Post

रांजणी येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रांजणी येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

रांजणी येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ