देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2026
in परभणी
0
मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या
Please Share

देवगावफाटा शिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास; खिशात चिठ्ठी आढळली

देवगावफाटा : मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याच्या नैराश्यातून सेलू तालुक्यातील देवगावफाटा येथील एका युवकाने शेतशिवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. जगन्नाथ उत्तमराव मोरे (वय ३५, रा. देवगावफाटा, ता. सेलू, जि. परभणी) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून, त्यात मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जगन्नाथ मोरे हे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चिंतेत व निराश असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने होऊनही आरक्षणाचा प्रश्न अद्याप निकाली लागत नसल्याची खंत ते व्यक्त करीत होते, असेही नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास देवगावफाटा शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत जगन्नाथ मोरे आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी पुंड, आर. एम. कोंडरे, रविकुमार मगरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी मृताच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चारठाणा पोलिस ठाण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. जगन्नाथ मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ व भावजयी असा परिवार आहे.फोटो ओळ मयत जगन्नाथ उत्तमराव मोरे.

Post Views: 1,495
Please Share
Previous Post

सेलू येथे ‘अमृत दौड’ उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद

Next Post

जगाचा पोशिंदाच उपाशी..!

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जगाचा पोशिंदाच उपाशी..!

जगाचा पोशिंदाच उपाशी..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ