देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू येथे ‘अमृत दौड’ उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2026
in परभणी
0
सेलू येथे ‘अमृत दौड’ उत्साहात; तरुणाईचा मोठा प्रतिसाद
Please Share

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा अमृत महोत्सव व क्रीडा दिनानिमित्त विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम

सेलू : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विवेकानंद प्राथमिक विद्यालय, सेलू यांच्या वतीने आयोजित ‘अमृत दौड’ उपक्रमाला शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निरोगी जीवनशैली, व्यायामाची आवड आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यासाठी या दौडीचे आयोजन करण्यात आले होते.

मंठा रोड ते बोर्डीकर कृषी महाविद्यालय या मार्गावर सकाळी ७ वाजता जिल्हा परिषदेचे माजी गटनेते तथा उद्योजक रामनाना खराबे (पाटील), उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे आणि स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून दौडला सुरुवात करण्यात आली. ‘चला धावूया, निरोगी राहू या’ हा संदेश देत सहभागी धावपटूंनी उत्साहपूर्ण वातावरणात दौड पूर्ण केली.

या स्पर्धेत मुलांच्या गटात परभणीच्या कुमार डिफेन्स अकॅडमीचा आदित्य गणेश कुऱ्हे (प्रथम), मुंजाजी नामदेव अमोघे (द्वितीय) तर गटकळ करिअर अकॅडमी सेलूचा अर्जुन विलास राठोड (तृतीय) यांनी यश मिळवले. मुलींच्या गटात गटकळ करिअर अकॅडमी सेलूच्या पल्लवी प्रल्हाद माने (प्रथम), कुसुम बाळू आढे (द्वितीय) तर राधा ज्ञानेश्वर गवळी (तृतीय) यांनी क्रमांक पटकावला. विजेत्यांना डॉ. रवींद्र घोडके व डॉ. दिगंबर घोडके यांच्यातर्फे पारितोषिके देण्यात आली.

या दौडसाठी गणेश माळवे, संजय भुमकर, सुभाष मोहकरे यांनी पंच म्हणून काम पाहिले. गटकळ करिअर अकॅडमीचे गोरखनाथ राऊत, योगेश राठोड तसेच कमांडो करिअर अकॅडमीचे सचिन काकडे, सतीश जाधव, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाने सहकार्य केले. दौडीनंतर स्पर्धकांना फळे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव एकशिंगे यांनी केले. सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी, बक्षीस यादी वाचन गजानन साळवे यांनी, तर अनिल कौसडीकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा उपक्रम समिती प्रमुख दीपाली पवार व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,631
Please Share
Previous Post

खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता

Next Post

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी युवकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ