देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा नांदेड

आर्किटेक्ट शिवानी बाहेती-मानधने यांना राष्ट्रीय पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 25, 2026
in नांदेड
0
आर्किटेक्ट शिवानी बाहेती-मानधने  यांना राष्ट्रीय पुरस्कार
Please Share

जर्मनीतील संसद भवनाचे वास्तुशिल्पीय सौंदर्य टिपले कॅमेऱ्यात

देशनिष्ठ प्रतिनिधी, नांदेड : वास्तुशिल्पाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी, प्रकाश-छायांचा कलात्मक वापर आणि छायाचित्रणातील कल्पकतेच्या जोरावर जर्मनी येथे वास्तव्यास असलेल्या नांदेड येथील आर्किटेक्ट शिवानी प्रतिक बाहेती-मानधने यांनी राष्ट्रीय स्तरावर नांदेडचे नाव उज्ज्वल केले आहे. ‘शी डिझाईन्स’ राष्ट्रीय वास्तुशिल्प स्पर्धा २०२६ मधील वास्तुशिल्प छायाचित्रण विभागात त्यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला.

सुनिता महेश बाहेती यांच्या स्नुषा आणि सारिका संतोष मानधने यांच्या कन्या असलेल्या शिवानी यांनी ‘द फ्री स्टँडिंग जिओमेट्री’ हे छायाचित्र स्पर्धेसाठी सादर केले होते. जर्मनीतील बर्लिन संसद संकुलाचे वास्तुशिल्पीय सौंदर्य त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून कॅमेऱ्यात टिपले. वास्तूची रचना, अवकाश, प्रकाश, भूमिती आणि उभ्या रेषांचा प्रभाव या छायाचित्रनात प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, या छायाचित्रचे नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष परीक्षांसमोर सादरीकरण व परीक्षण करण्यात आले. देशभरातील महिला व्यावसायिकांच्या सहभागाच्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शिवानी यांच्या कलाकृतीला प्रथम क्रमांक मिळणे ही त्यांच्या सर्जनशीलतेची आणि वास्तुशिल्पीय जाणिवेची पावती मानली जात आहे. वेड एशियाच्या माध्यमातून वास्तुशिल्प, अंतर्गत सजावट, बांधकाम, भू-दृश्यरचना, कला आणि छायाचित्रण क्षेत्रातील महिलांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते.

या प्रतिष्ठित राष्ट्रीय मंचावरील पुरस्कारामुळे शिवानी यांच्या सर्जनशील कार्याला नवी ओळख मिळाली आहे. शिवानी बाहेती-मानधने यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबिय, मित्रपरिवार नांदेडकर आणि सेलू येथील शिवनारायण मालाणी आणि मालाणी कुटुंबीयाकडून अभिनंदन होत आहे.

Post Views: 1,562
Please Share
Previous Post

महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाईचा बडगा

Next Post

स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची परभणीत ‘शांती पर्व संदेश’ व्याख्यानमाला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची परभणीत ‘शांती पर्व संदेश’ व्याख्यानमाला

स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची परभणीत ‘शांती पर्व संदेश’ व्याख्यानमाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

पिके करपली; पण जायकवाडीचे पाणी ओढ्या-नाल्यात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

पाथरीत अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरूद्ध संताप पाथरी : जायकवाडी उपविभागाचे उपअभियंता व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालवा क्रमांक ५९ चे पाणी शेतकऱ्यांच्या शेताऐवजी...

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत लातूरचा डंका

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 16, 2026
0

सेलूत प्रा.शंकर गंधम सर यांच्या स्मृतिनिमित्त आयोजन : ठाणे, बुलढाणा, मुंबई व नांदेडचेही विविध गटांत यश सेलू : टग ऑफ...

संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

संत गजानन महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2026
0

सेलूत कीर्तन व महाप्रसादास भाविकांची गर्दी सेलू : सेलू येथील स्वामी विवेकानंद नगरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात मंगळवारी, १५...

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तेजश्री चौधरीची विभागस्तरासाठी निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 15, 2026
0

परभणी जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक सेलू : जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ मध्ये सेलू येथील प्रिन्स इंग्लिश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ