देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

प्रा.किरण सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त १११ जणांचे रक्तदान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 28, 2025
in परभणी, मराठवाडा
0
प्रा.किरण सोनटक्के यांच्या वाढदिवसानिमित्त १११ जणांचे रक्तदान
Please Share

धर्मापुरीतील ज्ञानसाधना प्रतिष्ठान परिसरात अभीष्टचिंतन सोहळा उत्साहात

परभणी : शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे धर्मापुरी (ता.परभणी) येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शिक्षक सेलच्या राज्यप्रमुख पदी निवड झाली आहे. याबद्दल त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी, २७ ऑक्टोबर रोजी अभिष्टचिंतन आणि सत्कार सोहळा आयोजिण्यात आला होता. याचे औचित्य साधून ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १११ पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व जपले आहे.

प्रारंभी महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन झाले. अध्यक्षस्थानी शिवसांभ सोनटक्के होते. याप्रसंगी सचिव प्रा. शितल सोनटक्के, गंगाबाई सोनटक्के, अशोकअप्पा धुळे, उमादेवी धुळे, शिल्पा आमलापुरे, गयाताई भालेराव, केशवअण्णा दुधाटे, रणजित काकडे, अरविंद शहाणे, मंगेश कऊटकर, कुबडे, सरोज देशपांडे, मधुरा उमरीकर, कांचनताई कारेगावकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. याप्रसंगी सत्कारमूर्ती प्रा. किरण सोनटक्के यांचे मातोश्री गंगाबाई यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

संस्थेतील सर्व विभागांच्या वतीने तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा. सोनटक्के यांचा सन्मान केला. प्रास्ताविकात सचिव प्रा. शितल सोनटक्के यांनी प्रा. किरण सोनटक्के यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची माहिती दिली. सत्काराला उत्तर देताना प्रा. सोनटक्के म्हणाले की, हा सन्मान मला यापुढील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. माजी आमदार विजयराव गव्हाणे, भिमराव हत्तीअंबीरे, गटशिक्षणाधिकारी सुभाषराव आम्ले, प्राचार्य डॉ. प्रल्हाद खुणे, अधिव्याख्याता गणेश शिंदे, शिवा संघटनेचे धन्यकुमार शिवणकर, देवानंद वाघमारे, गुलाबराव वाघमारे, डॉ.पंकज खेडकर, शिवअण्णा पाथरकर, बंडू पचलिंग, मनीष देशमुख, एम. एस. पुरी, नागेश सिराळ, शेख मोसीन, बंटी जोध, आपली परभणी व स्वच्छ परभणीचे सदस्य, मदनराव लांडगे, सम्राट युवक मित्र मंडळ अशा अनेक शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोनटक्के यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्राध्यापक एस.डी.धुळे व प्राध्यापक पी.व्ही.कदम यांनी केले. एम.जे.जोशी यांनी आभार मानले.

Post Views: 1,686
Please Share
Previous Post

शासनाने तत्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

संतप्त शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांची गाडी फोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ