देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 16, 2025
in परभणी
0
एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव
Please Share

क्रीडा स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलचे वर्चस्व, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

सेलू/प्रतिनिधी : जिल्हा युवा अधिकारी कार्यालय व मेरा युवा भारत केंद्र, परभणी तसेच श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत शाळेने विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले वर्चस्व गाजवत एकाच दिवशी तब्बल १३ चषकांवर नाव कोरले. या घवघवीत यशामुळे यशस्वी खेळाडूंची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता निश्चित झाली आहे.

श्रीराम प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या मुला-मुलींनी सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात उत्कृष्ट कौशल्य दाखवले. १८ वर्षांखालील मुलींच्या खो-खो संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम व द्वितीय अशा दोन्ही क्रमांकांवर कब्जा केला. धावण्याच्या शर्यतीत अरुण फोले आणि प्रतिभा माघाडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर गोळा फेक प्रकारात संभाजी खोकले आणि मनीषा धनवे यांनी सुवर्ण यश संपादन केले. यासोबतच धावणे आणि गोळा फेकच्या इतर गटांत संभाजी खोकले, एकनाथ माघाडे, मनीषा धनवे, रंजनी दारशिंबे, रजनी धांडे आणि वैशाली कसदेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत चषकांची संख्या वाढवली.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे आणि सदस्य डॉ. आदित्य रोडगे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अ‍ॅड. दत्तराव कदम, माऊली ताठे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला आणि प्रा. प्रगती क्षिरसागर यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. या खेळाडूंना सुरज शिंदे, कपील ठाकूर, प्रमोद गायकवाड, मुन्ना शेख, कुणाल चव्हाण आणि आकाश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post Views: 1,621
Please Share
Previous Post

बालवैज्ञानिक स्पर्धेत ‘नूतन’ चे घवघवीत यश

Next Post

सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ