देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 17, 2025
in परभणी
0
सेलूचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात
Please Share

बांबू लागवड बिलासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथरी टोल नाका येथे रंगेहाथ कारवाई

परभणी : बांबू लागवडीच्या कामाचे बिल मंजूर करून ते स्वाक्षरीसह वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागातील वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. अमोल गणेशराव फड असे अटक करण्यात आलेल्या ३९ वर्षीय आरोपीचे नाव असून तो सामाजिक वनीकरण विभाग सेलू येथे वनपाल म्हणून कार्यरत होता, तसेच त्याच्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता.या प्रकरणातील तक्रारदार यांची मानवत तालुक्यातील मौजे मानोली येथे शेतजमीन असून, त्या ठिकाणी बांबू लागवडीचे कुशल काम करण्यात आले होते. या कामाचे १ लाख ७३ हजार २८० रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अमोल फड याने एकूण बिलाच्या १५ टक्के रकमेची मागणी केली होती. या मागणीबाबत दोन्ही बाजूंमध्ये तडजोड होऊन १० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. या ठरलेल्या रकमेपैकी २ हजार रुपये आरोपीने आधीच स्वीकारले होते, तर उर्वरित रकमेसाठी त्याने तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावला होता.या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने १६ डिसेंबर रोजी परभणी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी विभागाने पडताळणी केली असता आरोपीने लाचेची मागणी कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार १६ डिसेंबर रोजी पाथरी टोल नाका परिसरात सापळा रचण्यात आला. या ठिकाणी तक्रारदाराकडून लाचेचा हप्ता म्हणून ५ हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने झडप घालून आरोपीला ताब्यात घेतले.या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा क्रमांक ७०९/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अल्ताफ मुलाणी करत आहेत. शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Post Views: 1,702
Please Share
Previous Post

एकाच दिवशी १३ चषकांवर कोरले नाव

Next Post

केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान

केशवराज व्याख्यानमाला : मंजूषा कुलकर्णी यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ