देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2025
in परभणी, मराठवाडा
0
नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण
Please Share

प्रशासनाची मनमानी, भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप

सेलू जि.परभणी : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी सेलू तालुक्यातील नऊ गावांमध्ये सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत मोठा अन्याय होत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात गुरूवारपासून (१४ ऑगस्ट) सेलू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भूसंपादन करतानाजमिनीचा दर अत्यंत कमी दिला जात आहे. २०१४ च्या शासकीय रेडी रेकनरनुसार केवळ १ लाख ८० हजार रुपये प्रति एकर दर ठरवण्यात आला आहे. हा दर कवडीमोल आहे. जमिनीचे चुकीचे वर्गीकरण करून अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींना कोरडवाहू किंवा हंगामी जमिनी म्हणून दाखवण्यात आले आहे. यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. फळबागांचे अयोग्य मूल्यांकन करण्यात आले आहे. कृषी विभागाने फळबागांचे मूल्यांकन करताना झाडांऐवजी केवळ रोपांचे मूल्यांकन केले आहे. याशिवाय इतर विहिरी, पाईपलाईन आणि घरे यांसारख्या इतर मालमत्तांचे मूल्यांकनही योग्य प्रकारे करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या मनमानी धोरणाविरोधात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रमेश माने, गणेश मुंडे, दता देशमाने, मारोती बोडखे, जीवन गाडेकर, दता गाडेकर आदींचा समावेश आहे. निवेदनावर रामेश्वर गाडेकर, प्रशांत नाईक, रघुनाथ टाके, सुनील लिपणे, गोविंद गाडेकर, निशांत मुंडे आदींसह नऊ गावातील महामार्ग बाधीत अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. दरम्यान, गुरूवारी उपोषणस्थळी प्रशासनाचा एकही अधिकारी फिरकला नाही.

Post Views: 1,235
Please Share
Previous Post

केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

Next Post

आता उद्योग उभारणी झाली सोपी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
आता उद्योग उभारणी झाली सोपी

आता उद्योग उभारणी झाली सोपी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ