देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 13, 2025
in परभणी
0
केमापूर शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प
Please Share

केमापूरच्या शिक्षकांसह १२ ग्रामस्थांचा अवयवदानाचा संकल्प

‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमात अवयवदान पंधरवड्याची जनजागृती

सेलू : ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत, बुधवार, १३ ऑगस्टरोजी जिल्हा परिषद शाळा, केमापूर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर यांच्या प्रेरणेने आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवयवदान पंधरवड्याची जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डॉ.शरद ठाकर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शाळेतील पाचही शिक्षकांसह १२ ग्रामस्थांनी अवयव व उती दान करण्याची नोंदणी करून अवयवदानाचा संकल्प केला.

डॉ. शरद ठाकर यांनी अवयवदानासंदर्भातील गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व समजावून सांगितले. ते म्हणाले, “राष्ट्रीय अवयव व उती प्रत्यारोपण संस्था (NOTTO) च्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे ८ गरजूंना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे मृत्यूनंतरही अवयवदान करून गरजूंचे प्राण वाचवावेत.”

कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे आणि गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नारायण आष्टकर यांनी केले. प्रास्ताविक दगडुबा माघाडे यांनी केले, तर प्रणिता गाडे यांनी आभार मानले. प्रभावती घुगे आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती. दरम्यान, डॉ. कृष्णकुमार चौधरी यांनी या वेळी अवयवदान ही एक व्यापक जनचळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

Post Views: 1,164
Please Share
Previous Post

विज्ञान मेळाव्यात हर्षदा काष्टे, दिव्या, आयेशा विजेते

Next Post

नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण

नियमबाह्य भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचे सेलूत बेमुदत उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ