देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 20, 2025
in परभणी
0
रेल्वेच्या बदलांसोबत अपडेट राहा : प्रदीप जोहिरे
Please Share

रेल्वे प्रवासातून माणसातील माणुसकी जागृत होते – रविकिरण गंभीरे

सेलू : प्रवाशांना रेल्वे सेवेतील बदलांनुसार स्वतःला अपडेट करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे मत नांदेड विभागाचे मुख्य तिकिट निरीक्षक प्रदीप जोहिरे यांनी व्यक्त केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात १८ ऑगस्टरोजी आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या कार्यक्रमात अविनाथ वैद्य यांच्या ” रेल्वेची रंजक सफर ” या पुस्तकावर आयोजित चर्चेत ते बोलत होते.

या वेळी रविकिरण गंभीरे यांनी पुस्तकावर विस्तृत चर्चा मांडली. ते म्हणाले की, रेल्वे ही सामाजिक अभिसरणाचे केंद्र असून, प्रवासातून माणसातील माणुसकी जपायला शिकता येते. रेल्वे हे समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारे, कमी पैशात चांगला प्रवास घडवणारे आणि कोणताही भेदभाव न करता प्रवाशांना समान मानणारे साधन आहे. रेल्वे प्रवासात विविध स्वभावाच्या लोकांशी संवाद साधल्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला मिळते, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात शिवनारायण मालाणी यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या कामांची माहिती देत प्रवाशांनी आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमात प्रमिला धापसे लिखित ‘हाफ मेंटल’ या कादंबरीचे प्रकाशन महेश खारकर, चंद्रशेखर मुळावेकर, हेमंतराव आडळकर, डॉ. शरद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक एन.एम. देशपांडे यांनी केले, सूत्रसंचालन मौजम शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. ए.टी. देशमुख यांनी केले. यावेळी ए.टी. मदने, प्रा. राजाराम झोडगे, प्रा. अनंत मोगल, सुरेश अंभईकर, विशाल काला, शामसुंदर भुतडा, अजित मंडलिक, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह अनेक श्रोते उपस्थित होते.

Post Views: 1,187
Please Share
Previous Post

पावसात कुठलंही चुकीचं धाडस करू नका

Next Post

कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचा उत्साह

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन

कृषी विद्यापीठात आंतरमहाविद्यालयीन युवक व क्रीडा महोत्सवाचा उत्साह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१४ वर्षांनंतर जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे परभणी जिल्हा बँकेत पुनरागमन, अध्यक्षपदाची धुरा परभणी | प्रतिनिधी : "सगळ्याच...

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवली पदोन्नती वाशीम (फुलचंद भगत) : प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर...

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी प्रतिनिधी | पाथरी : पावसाअभावी पाथरी तालुक्यातील खरीप पिके आणि ऊस धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे...

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ