देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in परभणी
0
परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी बोर्डीकर, उपाध्यक्षपदी गोरेगावकर
Please Share

परभणीत कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद वामनराव कदम बोर्डीकर यांची आणि उपाध्यक्षपदी राजेश साहेबराव पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीकरीता शेतकरी भवन सभागृहामध्ये सोमवारी, ३ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्यासी अधिकारी एस.पी.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सकाळी अकरा ते साडे अकरा या वेळेत ही दोन्ही पदाकरीता उमेदवारी अर्ज मागविण्यात आले. छाननी प्रक्रिया पाठोपाठ पार पडली. अध्यक्षपदासाठी जेष्ठ नेते बोर्डीकर आणि भावना सचिन मुंगसे बोर्डीकर असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी भावना बोर्डीकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने श्री.बोर्डीकर यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी यांनी घोषित केले. उपाध्यक्षपदाकरिताही आमदार सईद खान शेरगुल खान आणि राजेश साहेबराव पाटील गोरेगावकर असे दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. मात्र, आमदार सईद खान यांनी अर्ज मागे घेतल्याने राजेश पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले‌ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी.काकडे यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एम. यु. यादव आणि बी.एस.नांदापूरकर तसेच सचिन लोणीकर, डी.जी.पठाण आणि गोविंद कदम यांनी सहकार्य केले. निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा श्री.काकडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, सचिन माळवटकर आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, या निवडीचे सहकार भवन परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे आदींसह संचालक व मान्यवर उपस्थित होते.

Post Views: 1,689
Please Share
Previous Post

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

Next Post

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ