देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतूर तालुक्यातील सिंचनाचा मार्ग मोकळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 21, 2025
in परभणी
0
जिंतूर तालुक्यातील सिंचनाचा मार्ग मोकळा
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती : सेलू व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणी उपलब्ध होणार

परभणी : जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत जिंतूर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील सिंचन भवनात झालेल्या बैठकीत परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे सिंचन, रोजगार, ऊर्जा निर्मिती आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

बैठकीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या विशेष मागणीनुसार सेलू व मानवत तालुक्यातील ५४ गावांना पाणी उपलब्ध करून देणे तसेच पुर्णा प्रकल्पातून जिंतूर तालुक्यातील गावांना पाणी पुरवठ्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे जिंतूर तालुक्यातील बळीराजाचा कायमचा जलसिंचनाचा प्रश्न मिटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, येलदरी व सिद्धेश्वर धरणातून उजव्या कालव्याचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार असून या उपक्रमामुळे जिंतूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेती ओलिताखाली येणार आहे.

बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आ. अब्दुल सत्तार, आ. विलास भुमरे यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक जयंत गवळी, अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर तसेच विविध अधिकारी उपस्थित होते. या निर्णयांमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, पाणीपुरवठा, शेतीसाठी सिंचन, ऊर्जा निर्मिती, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार यांना नवे बळ मिळेल, असा विश्वास पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

Post Views: 1,264
Please Share
Previous Post

‘विज्ञानातील महिला’ नाट्याला तृतीय क्रमांक

Next Post

रवळगावच्या ‘आरती’ ला सुवर्णपदक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
रवळगावच्या 'आरती' ला सुवर्णपदक

रवळगावच्या 'आरती' ला सुवर्णपदक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ