देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रवळगावच्या ‘आरती’ ला सुवर्णपदक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 21, 2025
in परभणी, मराठवाडा
0
रवळगावच्या 'आरती' ला सुवर्णपदक
Please Share

भौतिकशास्त्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम, आर्थिक परिस्थितीवर केली मात

सेलू : तालुक्यातील रवळगाव येथील विद्यार्थिनी आरती जगन्नाथराव रोडगे हिने अतिशय कठीण आर्थिक परिस्थितीला सामोरे जात, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एमएससी फिजिक्स म्हणजेच, भौतिकशास्त्र विषयात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करत आरतीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. २० सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तसेच कुलगुरू मनोहर चासकर, प्र .प्र.कुलगुरू अशोक महाजन यांच्या उपस्थितीत आरतीचा सुवर्णपदक व सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते परभणी येथे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला होता.

सेलू शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर रवळगाव आहे. येथील मुले, मुली पहाटे चार वाजल्यापासून सायकलद्वारे आपल्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात करतात. गावापासून सायकल वरून सुरू झालेला हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांना लाल दिव्याच्या गाडीपर्यंत पोहचविणारा ठरला आहे. रवळगावातील अनेक विद्यार्थी वर्ग एक व वर्ग दोन जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच तत्सम पदापर्यंत पोहोचलेले आहेत. हाच आदर्श उराशी बाळगून तेथील इतर विद्यार्थ्यांची देखील वाटचाल सुरू आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील आरती जगन्नाथराव रोडगे हिचा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणातील ध्येय व स्वप्न गाठण्यासाठी काटेरी रस्त्यावरून प्रवास सुरूच होता. रवळगाव येथून सायकल द्वारे दहावी व पदवीपर्यंतचे शिक्षण सेलू येथे पूर्ण केल्यानंतर, उच्च शिक्षणासाठी केवळ आर्थिक अडचणीमुळे तीने एक वर्ष घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुठलाही बाऊ न करता ते एक वर्ष मागे टाकत, पुन्हा एकदा उच्च शिक्षणासाठी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात एमएससी भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रवेश घेतला. आणि कठीण परिश्रम करून संपूर्ण विद्यापीठातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवत सुवर्णपदक पदकाला गवसणी घातली.

आरतीचे वडील जगन्नाथ रोडगे चार चाकी वाहन चालवून कुटुंबाची उपजीविका भागवतात. तर आई गृहणी आहे. संपूर्ण यशात आई वडील, भाऊ व रवळगाव येथील गावकरी मंडळी तसेच सेलू व स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील गुरुजन यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे आऱतीने सांगितले. या यशाबद्दल आरती आणि रोडगे कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post Views: 1,356
Please Share
Previous Post

जिंतूर तालुक्यातील सिंचनाचा मार्ग मोकळा

Next Post

शेतीमध्येच सर्वांना सांभाळण्याची ताकद

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शेतीमध्येच सर्वांना सांभाळण्याची ताकद

शेतीमध्येच सर्वांना सांभाळण्याची ताकद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ