देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
October 3, 2025
in महाराष्ट्र
0
कोल्हापूरचा शाही दसरा ऐतिहासिक थाटात
Please Share

शाही मिरवणुकीतून कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन ; सोने लुटण्यासाठी करवीरवासीयांची अभूतपूर्व गर्दी

कोल्हापूर, दि.०२ : विजयादशमी निमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात आज मावळत्या सूर्याच्या साक्षीने शाही दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि राजेशाही थाटात पार पडला. म्हैसूरनंतरचा देशातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव कोल्हापूरवासीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला. सोने लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या करवीरवासीयांनी अभूतपूर्व उत्साह दाखवला. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छांसह आपट्याची पाने एकमेकांना देत हा सोहळा साजरा झाला.

राजेशाही थाट आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम

कोल्हापूरच्या शाही दसरा उत्सवाला प्रमुख राज्य उत्सवाचा दर्जा प्राप्त असून, गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांनी शहरात उत्साहाचे वातावरण होते. असुरांचा संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या दुर्गेच्या नवरात्रोत्सवाची सांगता या शाही दसरा सोहळ्याने होते. विजयादशमीच्या निमित्ताने दसरा चौकात शमी पूजनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने आणि शाही थाटात पार पडला. करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानीच्या पालख्यांसह भालदार, चोपदार, घोडेस्वार आणि शाही लवाजम्यासह झालेली मिरवणूक कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी ठरली. या मिरवणुकीदरम्यान मार्गावर दोन्ही बाजूंनी पुष्पवृष्टी करत नागरिकांनी उत्साहात सहभाग घेतला.

राजघराण्याची उपस्थिती आणि शाही सलामी

सायंकाळी सहाच्या सुमारास न्यू पॅलेस येथून गाड्यांच्या ताफ्यासह मेबॅक मोटारीतून खासदार शाहू महाराज, माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार युवराज मालोजीराजे, शहाजीराजे आणि यशराजे यांचे दसरा चौकात आगमन झाले. उपस्थित करवीरवासीयांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. भालदारांनी ललकारी देत सलामी दिली, तर पोलिस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे मानगीत गायले गेले. यानंतर सरदार आणि मानकऱ्यांचे मुजरे घेत खासदार शाहू महाराजांसह राजघराण्यातील सदस्य स्थानापन्न झाले. पांढऱ्या रंगाच्या भव्य शामियानात सरदार, मनसबदार, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

शमी पूजन आणि सोने लुटण्याचा उत्साह

दसरा महोत्सव समितीच्यावतीने राजघराण्यातील सदस्यांचे स्वागत झाल्यानंतर राजपुरोहित यांच्या पौरोहित्याखाली शमी पूजनाचा विधी पार पडला. यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून अंबाबाईला सलामी देण्यात आली. सोने लुटण्याचा कार्यक्रम हा या सोहळ्याचा कळस ठरला. यावेळी करवीरवासीयांची अक्षरशः झुंबड उडाली. लुटलेले सोने घेऊन राजघराण्यातील सदस्यांना देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. “सोनं घ्या… सोन्यासारखं रहा” अशा शुभेच्छा देत हा उत्सव उत्साहात साजरा झाला.

मान्यवरांची उपस्थिती

या शाही सोहळ्याला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्यासह कला, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन, नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच सरदार, इनामदार घराण्यातील प्रमुख मानकरी आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

लोकसंस्कृतीचे दर्शन, ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा सन्मान

भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावरील राजेशाही मिरवणुकीत देवीच्या पालख्यांसह कोल्हापूरच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. या मिरवणुकीने करवीरवासीयांचे मन जिंकले. दसरा उत्सवाच्या या शाही सोहळ्याने कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची पुन्हा एकदा आठवण करून दिली. मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऑलिंपिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे यांचा सन्मान करीत त्यांना मिरवणुकीत विशेष स्थान देण्यात आले होते. मिरवणुकीत तालमींचे कुस्तीगीर, खेळाडू सहभागी झाले होते. तर रस्त्याच्या दुतर्फा एनसीसी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनी उभ्या होत्या. या मिरवणूकीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले. पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून कार्यक्रम निर्विघ्न पार पाडला.

Post Views: 1,261
Please Share
Previous Post

केंद्राकडून राज्याला ६ हजार कोटी

Next Post

महात्मा गांधी, शास्त्री यांना अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महात्मा गांधी, शास्त्री यांना अभिवादन

महात्मा गांधी, शास्त्री यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ